(Image Credit - PS. yogasana, bodyandsoul)
पोटावर जमा झालेली चरबी कमी करणं हा खूप मोठा टास्क वाटतो. महिलांसह पुरूषसुद्धा पोटावर जमा होत असलेल्या अतिरिक्त चरबीमुळे हैराण असतात. बॉडी फिटिंग आऊटफिट्समध्ये हे फॅट लगेच दिसून येतं ज्यामुळे तुमचा पूर्ण लूक बिघडू शकतो. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आवश्यक असलेले व्यायाम प्रकार तुम्ही २ आठवडे केल्यास फरक दिसून येईल.
१) हिल टच
या व्यायामासाठी चटईवर आपल्या पाठीवर झोपा. गुडघे वाकवून त्यांना मागच्या भागाजवळ ठेवा. आता खांदे किंचित वर करा आणि दोन्ही हातांनी आळीपाळीने पायांच्या घोट्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
२) स्ट्रेट बॉडी क्रंचेस
चटईवर सपाट झोपा. पाय सरळ ठेवा. डोक्याच्या मागे हात ठेवून, त्यांना एकत्र जोडा. आता शरीराला वर उचलण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान, हात आपल्या डोक्याच्या मागे राहिले पाहिजे
३) लाइंग वाइड सर्कल्स (Lying Wide circles)
आपल्या पाठीवर झोपा आणि हात मागच्या भागाखाली ठेवा. आता पाय वरच्या दिशेने उचला. मग पुन्हा खाली घ्या. १० ते २० वेळा ही कृती करा.
४) रिव्हर्स क्रंच- लेग लिफ्ट
यामध्ये, पाठीवर झोपून हात मागच्या भागाच्या खाली ठेवा. आता पाय डोक्याकडे आणा पुन्हा खालच्या दिशेनं न्या. १० ते २० वेळा ही कृती करा.
५) पुश थ्रु
सगळ्यात आधी पोटावर झोपा. आता खांद्यावर जोर देऊन शरीर उचलण्याचा प्रयत्न करा जमेल तितका वेळ या स्थितीत थांबून पुन्हा पूर्वस्थितीत या.
तर हे असे 5 व्यायाम आहेत जे करताना तुम्हाला तुमच्या पोटावर थोडासा दबाव जाणवेल. एका वेळी किमान 10-15 वेळा करण्याचा प्रयत्न करा. यानंतर 15-20 सेकंदांचा ब्रेक घ्या. मग पुन्हा सुरू करा. एकाचे किमान दोन ते तीन सेट करा, तरच तुम्हाला त्याचा लाभ लवकरच मिळेल.