Join us  

एक समोसा खाल्ल्याने आरोग्यावर किती परिणाम होतो? कॅलरीज बर्न करण्यासाठी काय करायला हवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 4:17 PM

How many calories does one Samosa have? एक समोसा खाल्ल्यानंतर किती कॅलरीज वाढतात? ती कशी कमी कराल?

'जबतक रहेगा समोसे में आलू..' हे गाणं आपण ऐकलंच असेल. समोसाप्रेमी आपल्याला प्रत्येक घरात सापडतील. भारतीय लोकांना समोसा खाण्याचं इतकं वेड आहे की, त्यांनी यावर गाणं देखील तयार केलं आहे. मैद्याची पट्टी, त्याच्याआत गरमागरम मसालेदार बटाट्याची भाजी, डीप फ्राईड हा पदार्थ खूप कुरकुरीत आणि चविष्ट लागतो. चवीच्याबाबतीत समोशाला तोड नाही. परंतु, आरोग्याच्या बाबतीत काय?

मैदा आणि बटाटा शरीरासाठी घातक मानले जाते. मैदा शरीरातील साखर वाढवते, तर बटाट्यामुळे लठ्ठपणा. पण एक समोसा खाल्ल्याने शरीरात किती कॅलरीज वाढतात, याची माहिती आपल्याला आहे का? एक समोसा खाल्ल्याने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, यासंदर्भात ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटला, आकाश हेल्थकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. अनुजा गौर यांनी माहिती दिली आहे(How many calories does one Samosa have?).

समोशाचे पौष्टिक मूल्य

१ समोसा = २६२ किलोकॅलरी

चरबी - ३ ग्रॅम

प्रथिने - १०. ५ ग्रॅम

कार्बोहायड्रेट - ४५ ग्रॅम

लघवी करताना आग जळजळ होते? तांदूळ पाण्याचा करा उपाय - डॉक्टरांनाही भेटाच

फायबर - १.५ ग्रॅम

समोशामध्ये स्टार्च जास्त आणि फायबर कमी असल्याने, एक समोसा खाल्ल्याने शरीराला २६२ कॅलरीज मिळतात. समोसे तेलात किवा तुपात तळले जातात. यामुळे त्यात भरपूर ट्रान्स फॅट असते. जे आपल्या शरीरासाठी घातक ठरते. जर हे समोसे वारंवार त्याच तेलात तळलेले असतील तर, ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.

एक समोसा खाल्ल्यानंतर वाढलेली कॅलरीज कमी कशी करावी?

एक तास चालणे.

एक तास पॉवर योगा करणे.

एक तास टेनिस खेळणे.

कशाला हवा टूथब्रश? बोटाने दात घासले तर काय बिघडतं? डेंटिस्ट सांगतात..

एक तास एरोबिक व्यायाम किंवा पोहणे.

काही लोकं समोसे खाऊन हे व्यायाम देखील करतात. पण नियमित समोसे खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. कारण यामुळे कॅलरीज तर वाढतातच, यासह बॅड कोलेस्टेरॉल देखील वाढते. ज्यामुळे लठ्ठपणा, चयापचय मंदावणे, मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्नव्यायामफिटनेस टिप्स