Water Drinking Tips : रोज पाणी पिणं आपल्या शरीरासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं. अनेक एक्सपर्ट रोज सकाळी झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण बरेच लोक सकाळी झोपेतून उठल्यावर आधी चहा किंवा कॉफी पितात. पण असं करणं आरोग्यासाठी चुकीचं असल्याचं एक्सपर्ट सांगतात. हिवाळा असो वा उन्हाळा तुम्हाला रोज सकाळी जर कोमट पाणी पिण्याची सवय असेल तर याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. हिवाळ्यात थंड पाणी पिणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हिवाळ्यात सकाळी किती ग्लास पाणी प्यावं आणि कसं प्यावं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हिवाळ्यात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायला हवं. यामुळे पचन तंत्र चांगलं राहतं. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात आणि बॉडी डिटॉक्स होतं. यामुळे रोज सकाळी पाणी पिण्याची सवय महत्वाची ठरते.
किती ग्लास पाणी प्यावं?
हिवाळ्यात लोक दिवसभर कमी पाणी पितात. याचं कारण हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर सकाळी २ ते ३ ग्लास कोमट पाणी प्यावे. जास्त गरम पाणी पिऊ नये. एकाच वेळी २ ते ३ ग्लास पाणी पिणं अवघड होत असेल तर हळूहळू प्यावे.
सकाळी रिकाम्या पोटी मध टाकलेलं पाणी
सकाळी कोमट पाण्यात थोडं मध टाकूनही पिऊ शकता. याने शरीराला दिवसभर एनर्जी मिळेल. ज्या लोकांना लिंबाने समस्या होत नाही ते लोक लिंबू पाणीही पिऊ शकता. लिंबू पाणी प्यायल्यावर साधारण अर्ध्या तासांनंतर चहा प्यावा. मध टाकलेलं पाणी किंवा लिंबू पाण्याने वजन कमी होण्यासही मदत मिळेल. पाणी खाली बसून एक एक घोट घेत प्यावे.
सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे
सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्यायल्याने पचन तंत्र मजबूत होतं. असं केल्याने पोषण तत्व तोडण्यास मदत मिळते. सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची लेव्हल योग्य ठेवता येते. हिवाळ्यात सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहतं. तसेच मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे शरीर आणि मेंदुत ऑक्सीजन योग्य प्रमाणात जातं. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ न होण्याची समस्याही दूर होते. ज्यामुळे लिव्हर आणि किडनीवर कमी प्रेशर पडतं. सकाळी पाणी प्यायल्याने त्वचाही निरोगी राहते.