Join us  

वॉक करता तरी वजन कमी होईना? १ किलो घटवण्यासाठी किती चालायचं पाहा-पटकन बारीक व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 4:54 PM

How Many Km You Have To Walk To Lose One Kg Weight : एक किलोग्राम  वजन कमी करण्यासाठी किती किलोमीटर पायी चालावं लागतं ते समजून घ्यायला हवं.

लठ्ठपणा (Obesity) अशी एक समस्या आहे जी खूपच कॉमन आहे. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. काहीजण लवकर उठून फिरायला जातात तर काहीजण पायी चालतात.  तुम्ही ऐकलं असेल  की पायी  चालल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पण  किती चालावं, याबाबत बऱ्याच लोकांना कल्पना नसेत. एक किलोग्राम  वजन कमी करण्यासाठी किती किलोमीटर पायी चालावं लागतं ते समजून घ्यायला हवं. (How Many Km You Have To Walk To Lose One Kg Weight)

वजन कमी करणं  ३ गोष्टींवर अवलंबून असते.  किती किलोमीटर चालायचं ते शरीराच्या वजनावर आधारीत असून  शरीराच्या वजनाबरोरबरच चालण्याची तीव्रता एकच असायला हवी. ज्यामुळे वजन कमी  करण्यावर परिणाम होतो. वेगानं चालण्याचा वजन कमी करण्यावर परिणाम होत असतो. शरीराच्या वजनाबरोरबच चालण्याच्या तीव्रतेचा वजन कमी करण्यावर परिणाम होतो.

आमीर खानने कसं कमी केलं २७ किलो वजन? वजन झटपट कमी करण्यासाठी पाहा त्याचं ‘खास’ डाएट

चालणं सामान्य असो किंवा वेगाने  वजनावर याचा परिणाम होतो.  चालण्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यक्तीला १ किलो वजन कमी करण्यासाठी जवळपास   ७००० कॅलरीज बर्न करण्याची आवश्यकता असते. 

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांच्यामते एक सामान्य व्यक्ती १ किलोमीटर चालते तेव्हा जवळपास ०.४ कॅलरीज आणि ०.५ कॅलरीज वाया जातात. या आधारावर ७० किलो वजनाची व्यक्ती जेव्हा एक किलोमीटर पायी चालते तेव्हा जवळपास  २८ ते ३५ कॅलरीज बर्न होतात. असं केल्यानं शरीरात फॅट बर्न होण्यासाठी ७ हजार कॅलरीज बर्न करावे लागतात.अशा व्यक्तीला एक किलोग्राम फॅट जाळण्यासाठी जवळपास  ७ हजार कॅलरीज  बर्न कराव्या लागतात. अशा स्थितीत फॅट बर्न करण्यासाठी २०० ते २५० किलोमीटर पायी चालावं लागते. 

पोट-मांड्याचा आकार वाढलाय? डॉ. श्रीराम नेने सांगतात 'वेटलॉस'चा खास फॉम्यूला, भराभर वजन घटेल

व्यक्तीने खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल न करता  २०० ते २५० किलोमीटर पायी चालायला हवं. इतके किलोमीटर  म्हणजे जवळपास २,५०,००० ते ३, १२, ५०० फिट असते. तासांमध्ये मोजायचं झालं  तर व्यक्तीने जवळपास ५ किलोमीटर जवळपास ४० ते ५० मिनिटं चालायला हवं. तेव्हा कुठे एक किलोग्राम वजन कमी करता येतं.  व्यक्तीने २०० ते २५० किलोमीटर रोज चालायला हवं.

अशा स्थितीत काही किलोमीटर चालून  तुम्ही वजन कमी करू शकता. नियमित चालायला जा, कमी कॅलरीजयुक्त खा, व्यायाम करणं विसरू नका, जेवणानंतर चालण्याची सवय ठेवा, शरीराला पुरेश्या प्रमाणात पाणी मिळेल याची काळजी  घ्या, जितकं होईल तितकं लिफ्टचा वापर करू नका,  शिड्यांचा वापर करा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य