Join us  

सकाळी की रात्री, कोणत्यावेळी चपाती खाल्ल्यानं लवकर वजन कमी होतं? फिट राहायचं तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 2:55 PM

How Many Rotis Should You Eat in One Day : चपातीमध्ये पोटॅशियम असते.पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणूनच चपातीचा समावेश आहारात करावा. 

भारतीय लोक आपल्या आहारात चपाती, भाताचे सेवन करतात.  जास्तीत जास्त लोक हे रात्रीच्यावेळी चपाती खातात तर अनेकांना भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही.  चपाती खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं का याबाबत डाएट एक्सपर्ट्सनी अधिक माहिती दिली आहे. चपातीमध्ये अधिक कॅलरीज आणि कार्ब्स असतात. (How many rotis should you eat in one day) 

जर तुम्ही रात्रीच्यावेळी चपाती खात असाल अनेकदा जास्त जेवणं शरीरासाठी धोकादायक ठरतं.  शरीरात साखरेचं उत्पादन अधिक होतं. यामुळे रक्तातीत साखरेचे प्रमाण वाढते. म्हणजेच रात्री उशीरा जेवताना आहारात चपातीचा समावेश करणं आरोग्यासाठी योग्य नाही.

रात्री चपाती खाल्ल्यानं शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय डायबिटीस आणि पीसीओडीचा त्रासही कमी होतो.जेव्हा रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं तेव्हा इंसुलिनवर परिणाम होतो. यामुळे शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम होतो. 

तब्येत चांगली राहण्यासाठी रात्री किती चपात्या खायच्या? 

एक लहानश्या चपातीत  ७१  कॅलरीज असतात. जर तुम्ही रात्रीच्या जेवणात २ चपात्या खात असाल तर त्यात १४० कॅलरीज असतात. चपातीसह भाज्या आणि सॅलेड्सचा समावेश आहारात करू शकता.  जास्त चपात्या खाल्ल्यानं शरीरातील कार्बोहाड्रेट्स वाढण्याची शक्यता असते.  रात्री जेवल्यानंतर जर तुम्ही वॉक करत नसाल तर वेगानं वजन वाढू सकतं. याशिवाय शरीराचं नुकसानही  होऊ शकतं.

ना डाएट- ना जीम; फक्त 5 रिफ्रेशिंग पदार्थ रोज घ्या; झरझर घटेल पोट, कंबरेची वाढलेली चरबी

चपातीमध्ये सिंपल कार्ब्स असतात ज्यामुळे मेटाबॉलिझ्म खराब होतो. यामुळे बॉऊल मुव्हमेंटवर प्रभाव पडतो. रात्री चपातीऐवजी भाकरीचा आहारात समावेश करा. यामुळे पचन चांगले होण्यास मदत होते.  रात्री २ पेक्षा जास्त चपात्या खाऊ नका. त्याऐवजी तुम्ही भरपूर फळे आणि भाज्या खाव्यात, ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

चपाती खाण्याचे फायदे

१) चपातीमध्ये पोटॅशियम असते. पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणूनच चपातीचा समावेश आहारात करावा. 

२)  जर एखाद्या व्यक्तीच्या सांध्यांमध्ये वेदना होत असतील तर चपाती खायला हवी. चपाती खाल्ल्यानं शरीराला प्रोटीन्स (protein) आणि कॅल्शियम (calcium)  मिळते. 

शरीर बारीकच पण कंबर, मांड्यांचा आकार वाढलाय? हा १ व्यायाम रोज करा, मेंटेन फिगरचं सिक्रेट

३) जर एखाद्या व्यक्तीला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यानं चपाती खावी. चपाती खाल्ल्याने प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते. त्यामुळे स्नायू मजबूत होतात.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य