चालणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दिवसभरात भरपूर चालल्याने आपल्या सर्वांगाचा व्यायाम होतो. चालणे हे निरोगी शरीर आणि मनासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. योग्य पद्धतीने चालण्याचा व्यायाम केल्यास आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता सुरळीत सुरू राहते. नियमित जितका वेळ आपण चालतो तितक्या जलद गतीने कॅलरी घटवण्यास मदत मिळते. शरीर फिट ठेवण्यासाठीचा हा सोपा व्यायाम प्रकार आहे. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
चालणे हा असा व्यायाम आहे जो कोणीही करू शकतो. ज्यामध्ये आपले संपूर्ण शरीर अॅक्टिव्ह राहते आणि आपल्या शरीराचा प्रत्येक भाग वेगाने काम करतो. अशा परिस्थितीत जर आपण नियमित चालत असाल तर आपल्याला इतर कोणत्याही व्यायामाची फारशी गरज भासत नाही. चालण्याचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे परंतु नेमकं कोणत्या वयातील व्यक्तींनी प्रत्येक दिवशी किती पावले चालावे, याची योग्य माहिती सगळ्यांनाच असतेच असे नाही(How many steps should people take per day according to their age ?).
स्वीडनच्या विद्यापीठातील संशोधकांनी केलेला अभ्यास नेमकं काय सांगतो...
स्वीडनच्या कालमार विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की जर एखाद्या व्यक्तीने त्याचे वय लक्षात घेऊन चालले तर ते केवळ वाढत्या वजनावरच नियंत्रण ठेवू शकत नाही, तर जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील ते प्रभावी ठरते. याच्या मदतीने हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब असे अनेक गंभीर आजार सहज आटोक्यात ठेवता येतात. या संशोधनाच्या आधारे जाणून घेऊया की, वयानुसार एखाद्या व्यक्तीने दररोज किती पावले चालली पाहिजेत.
१. संशोधनानुसार, ६ ते १७ वयोगटातील मुले जितकी जास्त चालतात, तितका त्यांना फायदा होतो. या वयातील मुलांनी एका दिवसात किमान १५००० पावले चालावीत तर, मुलींनी १२००० पावले चालल्यास फायद्याचे ठरेल.
२. १८ ते ४० वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही दररोज किमान १२००० पावले तरी चालले पाहिजे.
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...
३. चाळीशीच्या पुढे गेल्यावर आरोग्याशी संबंधित समस्या अधिक दिसतात, तसेच या वयात अनावश्यक वजन वाढण्याची शक्यता जास्त असते, अशा परिस्थितीत या वयात दिवसातून ११,००० पावले चालण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
४. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी दररोज १०,००० पावले चालण्याचा सराव केला पाहिजे.
रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...
५. ६० वर्षांच्या वृद्धांनी निरोगी राहण्यासाठी दररोज किमान ८००० पावले चालणे आवश्यक आहे.
६. पण लक्षात ठेवा की चालणे म्हणजे आळशीपणाने चालणे असा याचा अर्थ होत नाही तर पावले जोमाने आणि गतीने टाकणे गरजेचे असते. त्याचवेळी, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना चालण्यात अडचण येते, म्हणून तज्ज्ञ त्यांना थकवा येईपर्यंतच चालण्याची शिफारस करतात.
पावसाळ्यात मॉर्निंग वॉकला जाता येतं नाही? ६ सोपे उपाय, घरातच राहून वजन होईल कमी...
अभ्यासकांच्या मते चालण्याचे फायदे :-
१. मन होईल मजबूत :- चालण्याने मन तीक्ष्ण होते. चालताना मेंदूमध्ये अनेक बदल होतात, त्याचा मेंदूवरही परिणाम होतो. एका संशोधनात असे म्हटले आहे की चालण्याने मेंदू आणि मज्जासंस्थेमध्ये उपस्थित हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे तणाव देखील कमी होतो. जर आपल्याला कधीही दुःखी, निराश, आळसपणा वाटत असेल तर आपण चालायला जाऊ शकता. यामुळे आपल्या मूडमध्ये बराच फरक दिसून येईल.
२. वजन कमी होईल :- रोज चालण्याने वजन झपाट्याने कमी होते. जर आपण दररोज ५ किलोमीटर चालत असाल तर आपल्याला इतर कोणताही व्यायाम करण्याची गरज नाही. वजन कमी करण्यासाठी, आपण थोडे वेगाने चालणे आवश्यक आहे. यामुळे आपले वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते.
३. कोलेस्ट्रॉलचा धोका होईल कमी :- चालण्यानेच माणूस अनेक गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. दररोज चालण्याने तणावाची पातळी कमी होते. धावणे किंवा वेगाने चालण्याने दृदयला जास्तीत जास्त रक्त पुरवठा होतो, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो.
४. रक्तदाब रहातो नियंत्रणात :- चालण्याच्या व्यायामाने रक्तदाबही स्थिर राहतो. चालणे देखील फुफ्फुसासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा अधिक प्रवाह होतो. दररोज चालण्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि स्नायूंचा टोन तंदुरुस्त राहतो. याशिवाय दररोज चालण्याने हाडे मजबूत होतात आणि सांध्यातील वेदना, सूज आणि जडपणा दूर होतो.