Join us  

कंटाळा आलाय? अनेकदा ठरवूनही व्यायाम करणं शक्य होत नाही; या ट्रिक्सनं स्वतःला प्रेरणा द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 12:55 PM

व्यायाम एखाद्यावेळी केला तरी त्यात सातत्य नसतं.  अशावेळी स्वतःला व्यायामाची सवय लावण्यासाठी  काही आयडीयाज तुम्हाला उपयोगी पडतील.

एकीकडे व्यायाम करण्याची कल्पना आणि दुसरीकडे येणारा आळस हे समीकरण ठरलेलं असतं. जेव्हाही तुम्ही व्यायाम करायचं ठरवता तेव्हा सगळ्यात आधी आड येतो तो म्हणजे आळस, 'बास्स  झालं आता सोमवारपासून व्यायाम करणार', असं अनेकदा ठरवूनही कृती प्रत्यक्षात उतरत नाही. व्यायाम एखाद्यावेळी केला तरी त्यात सातत्य नसतं.  अशावेळी स्वतःला व्यायामाची सवय लावण्यासाठी काही आयडीयाज तुम्हाला उपयोगी पडतील.

तुम्हाला खरंच व्यायाम करावासा वाटत असेल तर सगळ्यात आधी व्यायाम करण्यासाठी पार्टनरचा शोध घ्या.  त्यासाठी मित्र परिवार किंवा कुटुंबातील सदस्याची निवड करा. पार्टनर असा असावा जो व्यायामाबाबत नवीन नवीन उर्जा आणि सर्मपण निर्माण करेल. कोरोनाकाळ लक्षात घेता तुम्ही वेगवेगळ्या टेक्निक्सनी व्यायाम आणि योगा करायला हवा.

अन्य पर्यायांचा विचार करा

तुम्ही ज्या व्यायाम प्रकारांचा अवलंब करता. ते तुम्हाला आवडायला हवेत.  नियमित व्यायाम जर तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर  जुंबा किंवा एरोबिक्स करू शकतात. तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर तोही एक उत्तम मार्ग आहे. योगा आणि इतर सोपे व्यायाम प्रकार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करू शकता. आठवड्याभराचं एक रूटीन तयार करून व्यायाम केल्यास फरक दिसून येईल. 

ऑनलाईन क्लासेस

जर रोज व्यायाम करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. योगा, व्यायाम इतर फिटनेस व्यायाम प्रकार तुमच्या  रूटीनचा भाग बनू शकतात. हळू हळू एक व्यायाम प्रकार शिकत गेल्यानं तुम्हाला सवय होईल आणि एक दिवस असा येईल की, व्यायामाला वेळ देऊ शकला नाही तर तुम्हाला चैन पडणार नाही. काही सोपे व्यायाम प्रकार तुम्ही कधी आणि कुठेही करू शकता. 

वॉकिंग

तज्ञांनी असे नमूद केले आहे की दररोज चालणे हा सर्वात चांगला आणि सोपा व्यायाम आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी लॉकडाउन असताना आपण घरामध्ये, गच्चीवर, बागेत किंवा ट्रेडमिलवर देखील हा व्यायाम करू शकता. एक तास चाला आपल्याला 200-350 कॅलरी बर्न करण्यास मदत करू शकते. कोविडच्या अनेक लक्षणांसाठी हा उत्तम उपाय ठरेल.

स्ट्रेथ ट्रनिंग व्यायाम

या व्यतिरिक्त काही व्यायामांचे प्रशिक्षण घेऊन आपल्याला फायदा देखील मिळू शकेल. यासाठी आपण वेट लिफ्टिंगसारखे व्यायाम करू शकता, घाबरू नका आपल्याला जिममध्ये जाण्याची किंवा हेवीवेट उचलावा लागणार नाही. आपण हे सहज घरी देखील करू शकता. १ ते २ किलो घरगुती वस्तूंसह आपण असे व्यायाम देखील करु शकता. हाताच्या स्नायूंची शक्ती सुधारण्यासाठी दररोज कमीतकमी 5 मिनिटे आर्म-वर्कआऊट करणे आवश्यक आहे. पाय बळकट करण्यासाठी स्क्वॅट्स आणि लंज यासारखे व्यायाम खूप फायदेशीर मानले जातात.

टॅग्स :हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्यमहिला