Join us  

शरीर सडपातळ, पोट फार सुटलंय? रोज फक्त इतकी पाऊलं चाला; झरझर घटेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 1:17 PM

How much steps required for weight loss : जे लोक ८ ते १० तास ऑफिसमध्ये बसून काम करतात त्यांना कोरोनरी आर्टरी  डिसिज, ट्रिपल वेसल डिजीज, हार्ट अटॅकसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आजकाल बरेच उपाय केले जातात. रोज चालायला जाणं त्यापैकीच एक आहे. रोज चालण्याची सवय  फिट राहण्यसाठी गरजेची आहे. रोज अर्धा तास का होईना चालण्याची सवय ठेवल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. खासकरून पोटाची आणि कमरेची चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी किंवा संध्याकाळी चालण्याचा सल्ला दिला जातो.  फ्लॅट टमी मिळवण्यासाठी रोज किती चालायचं असा अनेकांना प्रश्न पडतो. (How much steps required for weight loss)

जर तुम्ही रोज पायी चालाल तर काहीही न करता पोटाची चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते. चांगल्या परीणामांसाठी नॉर्मल वॉकिंगपेक्षा  वेगानं चालण्याची सवय ठेवा. जे लोक  ८ ते १० तास ऑफिसमध्ये बसून काम करतात त्यांना कोरोनरी आर्टरी  डिसिज, ट्रिपल वेसल डिजीज, हार्ट अटॅकसारखे गंभीर आजार होऊ शकतात. फिजिकल एक्टिव्हीजच्या अभावानं कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा वाढत जातो. यासाठी  बॉडी मुव्हमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. (Morning walk will burn belly fat with fast speed)

- कॅनडामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, ज्या महिला साडेतीन महिने रोज सुमारे एक तास चालत होत्या त्यांनी आहारात कोणताही बदल केला नव्हता. त्यांच्या पोटाची चरबी २० टक्क्यांनी कमी झाली होती. म्हणूनच तुम्ही शक्य तितके चालण्याचा प्रयत्न करा, कारण जास्त वेळ बसल्याने शरीराचे खूप नुकसान होते.

-चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे, जर तुम्हाला लठ्ठपणा वाढू नये आणि तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका नसावा असे वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही किमान 10 हजार पावले चालले पाहिजेत, जर तुम्ही दररोज इतके कष्ट केले तर तुमचे आरोग्य चांगले राहील. अनेक आश्चर्यकारक फायदे होतील, त्याचा परिणाम काही आठवड्यांत दिसून येईल.

-चालण्याने तुमची पचनक्रिया आणि चयापचय क्रिया निरोगी राहते, यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते , याशिवाय आपले मानसिक आरोग्य देखील सुधारते, त्यामुळे दररोज चालण्याची सवय लावा.

-रोज चालल्यानं डायबिटीसचा धोका कमी होतो. डायबिटीसच्या रुग्णांसाठी हा व्यायाम एक वरदान आहे.याशिवाय तुम्हाला डाएटचीसुद्धा काळजी घ्यावी लागेल.

- दुपारच्या जेवणानंतर चालल्यानंतर अन्न पचवण्याची क्षमता वाढते. एंडोर्फिन वेदना आणि  ताणतणावाचे हॉर्मोन्स रिलिज करते. ज्यामुळे ताण-तणाव दूर होण्यास मदत होते.

- रोज चालल्यानं स्नायू मजबूत होतात आणि झोपही चांगली लागते.  चालल्यानं तुम्हाला किमान 150-200 कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स