Lokmat Sakhi >Fitness > हिवाळ्यात किती तास आणि कोणत्या वेळी वॉक करणं योग्य? वाचा एक्सपर्टचा सल्ला!

हिवाळ्यात किती तास आणि कोणत्या वेळी वॉक करणं योग्य? वाचा एक्सपर्टचा सल्ला!

Walk In Winter : लोक हिवाळ्यात किती वेळ पायी चालावं आणि कोणत्या वेळी चालावं? याबाबत कन्फ्यूज असतात. तेच आज जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:35 IST2024-12-19T11:01:31+5:302024-12-19T16:35:02+5:30

Walk In Winter : लोक हिवाळ्यात किती वेळ पायी चालावं आणि कोणत्या वेळी चालावं? याबाबत कन्फ्यूज असतात. तेच आज जाणून घेऊ.

How much time and good time to walk in winter | हिवाळ्यात किती तास आणि कोणत्या वेळी वॉक करणं योग्य? वाचा एक्सपर्टचा सल्ला!

हिवाळ्यात किती तास आणि कोणत्या वेळी वॉक करणं योग्य? वाचा एक्सपर्टचा सल्ला!

Walk In Winter : हिवाळ्यात खाण्या-पिण्याची चांगलीच चंगळ असते. या दिवसांमध्ये लोक तळलेले आणि गरम पदार्थ आवडीने खातात. अशात पाणी पिणं कमी आणि खाणं जास्त होतं. ज्यामुळे अर्थातच वजन वाढतं. हिवाळ्यात लोक वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, पराठे बनवून खातात. या गोष्टी खायला तर मजा येते, पण यासोबतच या दिवसात एक काम केलं पाहिजे ते म्हणजे एक कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टिविटी. हिवाळा असो वा उन्हाळा फिट राहण्यासाठी वॉक करणं सगळ्यात चांगला पर्याय आहे. सकाळी फिरणं आरोग्यासाठी चांगलं असतं. मात्र, लोक हिवाळ्यात किती वेळ पायी चालावं आणि कोणत्या वेळी चालावं? याबाबत कन्फ्यूज असतात. तेच आज जाणून घेऊ.

हिवाळ्यात किती वेळ चालावं?

थंडीच्या दिवसांमध्ये कमीत कमी एक तास पायी चाललं पाहिजे, असं एक्सपर्ट सांगतात. शरीर गरम होण्यासाठीच १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. त्यानंतर तुम्ही साधारण ४५ मिनिटे वेगाने पायी चालावे. १ तास पायी चालल्यावर तुमचे साधारण ७ ते ८ हजार स्पेप्स पूर्ण होतात. बाकी दिवसभराच्या अ‍ॅक्टिविटीमध्ये तुम्ही २ हजार स्टेप्स पूर्ण करू शकता. 

थंडीत पायी चालण्याची योग्य वेळ?

हिवाळ्यात सकाळी ९ ते १० वाजता दरम्यान तुम्ही पायी चालावे. हलक उन्ह निघाल्यावर पायी चालल्याने शरीराला गरमी मिळते. तसेच यावेळी थंडीही कमी होते. सकाळी उन्हात पायी चालल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं. तुम्ही सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत कधीही पायी चलू शकता.

हिवाळ्यात कधी करू नये वॉक?

थंडीत डॉक्टर्स भल्या पहाटे पायी न चालण्याचा सल्ला देतात. या दिवसात सकाळी ४ किंवा ५ वाजता वॉकला चुकूनही जाऊ नये. या वेळेदरम्यान थंडी जास्त असते. सकाळी आपल्या शरीरात ब्लड फ्लो सुद्धा स्लो झालेला असतो. त्यामुळे यावेळी वॉक केल्याने आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. सकाळी लवकर उठून वॉक केल्याने ब्लड प्रेशर हाय होणे आणि हार्टवर प्रेशर पडण्याचा धोका वाढतो.

Web Title: How much time and good time to walk in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.