Lokmat Sakhi >Fitness > तापत्या उन्हात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कधी किती पाणी प्यावं?

तापत्या उन्हात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कधी किती पाणी प्यावं?

Water Drinking in Summer : अजूनही बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात एका व्यक्तीनं किती पाणी प्यावं? लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:12 IST2025-03-04T16:11:36+5:302025-03-04T16:12:46+5:30

Water Drinking in Summer : अजूनही बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात एका व्यक्तीनं किती पाणी प्यावं? लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत. 

How much water you should drink in summer | तापत्या उन्हात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कधी किती पाणी प्यावं?

तापत्या उन्हात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कधी किती पाणी प्यावं?

Water Drinking in Summer : फेब्रुवारी महिना नुकताच संपला. आता तर फॅन आणि एसीशिवाय राहणं अजिबात शक्य नाही. रात्री वाटणारा थंडावाही कमी झाला आहे. तापमान वाढलं की, घामही भरपूर येऊ लागतो आणि तोंड कोरडं पडू लागतं. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे शरीरात पुरेसं पाणी असणं गरजेचं असतं. पाणी जर कमी प्याल तर डिहायड्रेशनची समस्या होते. अशात अजूनही बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात एका व्यक्तीनं किती पाणी प्यावं? लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत. 

जीवन जगण्यासाठी पाणी किती महत्वाचं असतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आहारासोबतच भरपूर पाणी पिणं चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. खासकरून उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं. अशात जाणून घेऊ कधी आणि किती पाणी प्यावं.

उन्हाळ्यात किती पाणी प्यावं?

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, एका वयस्क व्यक्तीला आरोग्यासंबंधी समस्या दूर ठेवण्यासाठी रोज कमीत कमी २.७ लीटर पाणी पिणं गरजेचं आहे. असं केलं नाही तर डिहायड्रेशन धोका वाढू शकतो. तेच एक आदर्श आकडा सांगायचा तर एका दिवसात कमीत कमी ७ ते ८ ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं.

झोपेतून उठल्यावर

सकाळी झोपेतून उठल्यावर एक ते दोन ग्लास पाणी पिणं खूप गरजेचं असतं. कारण रात्रभर शरीराला पाणी मिळालेलं नसतं. इतक्या तासांनंतर प्यायल्यावर शरीराला एनर्जी तर मिळतेच, सोबतच शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडता. 

जेवणाआधी किती?

अनेक एक्सपर्ट जेवणाआधी १ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. यानं वजन कमी करण्यासही मदत मिळते. सोबतच जेवणाआधी पाणी प्यायल्यास पोट भरतं. ज्यामुळे जास्त खाणंही टाळता येतं. जेव्हा तुम्ही हायड्रेट असता तेव्हा पोटही जेवणासाठी तयार झालेलं असतं. पाणी चवीच्या पेशींना जागं करतं आणि पोटालाही मॉइश्चराइज करतो. 

वर्कआउटआधी

तापमान आणि तुमच्या शरीरातील द्रव्य स्तराच्या आधारावर तुम्हाला वर्कआउट दरम्यान आणि नंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी पिण्याची गरज असते. यानं तुमचा स्ट्रोकच्या समस्येपासूनही बचाव होऊ शकतो. 

वर्कआउटनंतर

वर्कआउटदरम्यान घाम आणि लघवी द्वारे शरीरातील पाण्याची लेव्हल कमी झालेली असते. अशात वर्कआउटनंतर पाणी पिणं गरजेचं असतं. तुम्ही कोणताही व्यायाम करा आणि कधीही करा, पण त्यानंतर एक ग्लास साधं पाणी आवर्जून प्यावं.

बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यावर

तुम्ही आजारी लोकांच्या संपर्कात आले असाल तर वायरस आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी तुम्हाला सामान्यापेक्षा थोडं जास्त पाणी प्यावं लागेल. यानं शरीर बॅक्टेरिया मुक्त होईल. तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल. 

आजारी असताना

तुम्हाला ताप, कफ किंवा सर्दीची समस्या असेल तेव्हा शरीरात पाणी कमी होतं. त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. अनेक तज्ज्ञ सांगतात की, अशा स्थितीत जर भरपूर पाणी सेवन केलं तर आजार लवकर दूर पळतो. 

थकवा आल्यावर

थकवा हा डिहायड्रेशनच्या लक्षणांपैकी एक आहे. जेव्हा शरीरात पाणी कमी होतं, तेव्हा थकवा आणि कमजोरी जाणवू लागते. तुम्हाला ऑफिसमध्ये काम करताना थकवा जाणवत असेल तर एक ग्लास पाणी घ्या, तुमचा थकवा दूर होईल.  

Web Title: How much water you should drink in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.