दिवसेंदिवस हळूहळू उन्हाच्या तडाख्याचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्याने जीव कासावीस होतो. जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो, तसे थकवा, डिहायड्रेशन, अंगाची लाही लाही होणे, पोटांत जळजळ होणे यासारख्या समस्या सतावू लागतात. उन्हाळयात होणाऱ्या या शारीरिक समस्यांपासून (How To Adjust Your Diet To Stay Cool During Summer Season) स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या (Foods, diet tips to beat the heat) सवयीत बदल केला पाहिजे. खरंतर, प्रत्येक ऋतूनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केला पाहिजे(Diet plan for summer season Stay cool, Hydrated and Healthy).
उन्हाळ्यात जर आपण आपल्या आहारात काही आवश्यक बदल केले तर शरीराला थंडावा मिळेल सोबतच आपण दिवसभर उत्साही देखील राहू. उन्हाळ्यात वाढती उष्णता आणि उकाड्याने अनेक शारीरिक समस्या सतावू नये यासाठी या दिवसात आपल्या डाएटमध्ये काही खास बदल केले पाहिजेत. आहारातील अशा बदलांमुळे उन्हाळ्यांत शारीरिक समस्या त्रास न देता आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
उन्हाळयात आपल्या आहारात कोणते मुख्य बदल करायला हवेत?
१. चहा - कॉफी पिणे सोडून नैसर्गिक पेये पिण्यावर अधिक भर द्या :- उन्हाळ्यात जास्त प्रमाणांत चहा, कॉफी पिल्याने शरीराचे नुकसान होते. एवढेच नाही तर जास्त प्रमाणांत चहा - कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी चहा - कॉफी ऐवजी, नारळ पाणी, बेल सरबत, कोकम सरबत, लिंबू पाणी आणि सत्तूचे सरबत अशी नैसर्गिक पेय पिण्यावर अधिक भर द्यावा. ही नैसर्गिक पेय शरीराला थंडावा देण्यासोबतच, शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील देण्यास मदत करतात.
वेटलॉससाठी तुम्हीसुद्धा 'हे' ६ शॉर्टकट वापरत असाल तर थांबा! वजन कणभर कमी होणार नाही, कारण...
२. दुधाऐवजी दही आणि ताक प्या :- उन्हाळ्यात, दुधाऐवजी दही आणि ताक यांचा आहारात समावेश करा. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे पचनसंस्था मजबूत ठेवते आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करतात. ताकामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे डिहायड्रेशन रोखतात आणि पोट हलके ठेवतात. दह्यामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रथिने हाडे मजबूत करतात आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. आपण ताकामध्ये थोडासा पुदिना किंवा काळे मीठ घालून देखील पिऊ शकता, यामुळे दही आणि ताकाची चव आणि आरोग्यदायी फायदे आणखी वाढतात.
३. साखरयुक्त पेयांपेक्षा फळं - भाज्यांचे ताजे रस प्या :- कॅन किंवा टिन मध्ये पॅकेजिंग केलेले रस आणि थंड पेये पिण्याऐवजी, घरीच तयार केलेल्या ताज्या फळांचा रस बनवा आणि प्या. लिंबू पाणी, टरबूजाचा रस आणि काकडी-लिंबूचे सरबत केवळ उष्णतेपासून आराम देत नाही तर शरीराला हायड्रेट देखील करतात.
ब्रा फॅट्स दिसल्याने शरीर बेढब दिसते? ४ सोपे व्यायाम करतात ब्रा फॅट्स कमी...
४. मसालेदार - चमचमीत ग्रेव्हीच्या भाज्या खाण्यापेक्षा पचायला हलक्या भाज्या खाव्यात :- उन्हाळ्यात जड आणि मसालेदार अन्नपदार्थ तसेच जड आणि चमचमीत ग्रेव्हीच्या भाज्या खाण्याऐवजी पचायला हलक्या, पाणीदार आणि हिरव्या भाज्या खाव्यात. दुधी, भोपळा, पालक आणि टोमॅटो यांसारख्या भाज्या शरीराला थंडावा देतात आणि पचायलाही सोपे असतात. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होत नाहीत.
५. संध्याकाळच्या ड्राय स्नॅक्सच्या जागी ताजे सॅलॅड - फळं खा :- उन्हाळ्यात, तळलेले अन्न आणि पॅक केलेले स्नॅक्स खाण्याऐवजी, ताजी फळे आणि सॅलॅडला प्राधान्य द्या. काकडी, टोमॅटो, गाजर आणि मुळा यापासून बनवलेले सॅलॅड शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि पोट हलके ठेवते. याव्यतिरिक्त, त्यात फायबर आणि आवश्यक खनिजे असतात, जे पचनसंस्था मजबूत करतात. हिरव्या पालेभाज्या आणि अंकुरलेले कडधान्ये उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही सॅलॅडमध्ये लिंबाचा रस आणि दही घातलं तर ते आणखी पौष्टिक बनते. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात छोटे बदल करणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार घेतल्याने तुम्ही फक्त डिहायड्रेशन आणि थकवा टाळू शकत नाही तर तुम्हाला हलके आणि उत्साही देखील वाटेल.