Lokmat Sakhi >Fitness > गोष्टी विसरायला होतात, डोकं चालत नाही? रोज खा ५ पदार्थ, स्मरणशक्ती वाढेल-डोकं चालेल सुसाट

गोष्टी विसरायला होतात, डोकं चालत नाही? रोज खा ५ पदार्थ, स्मरणशक्ती वाढेल-डोकं चालेल सुसाट

How to Boost Brain Power and Memory : स्मरणशक्ती वाढवण्यााठी ताण-तणाव कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह राहणं फार महत्वाचं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:22 PM2023-09-26T12:22:50+5:302023-09-27T11:48:23+5:30

How to Boost Brain Power and Memory : स्मरणशक्ती वाढवण्यााठी ताण-तणाव कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह राहणं फार महत्वाचं आहे.

How to Boost Brain Power and Memory : Food For Improve Your Memory | गोष्टी विसरायला होतात, डोकं चालत नाही? रोज खा ५ पदार्थ, स्मरणशक्ती वाढेल-डोकं चालेल सुसाट

गोष्टी विसरायला होतात, डोकं चालत नाही? रोज खा ५ पदार्थ, स्मरणशक्ती वाढेल-डोकं चालेल सुसाट

जर तुम्हाला काहीच लक्षात राहत नसेल किंवा कोणताही निर्णय पटकन घेऊ शकत नसाल किंवा मानसिक ताण-तणावाखीला राहत असाल याचा अर्थ तुमची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे.(Food For Improve Your Memory) साध्या शब्दात म्हणायचचं झालं तर  रोजच्या धावपळीच्या जीवनात आणि त्याच त्याच रूटीनमुळे डोकं व्यवस्थित चालत नाही.(Best Foods to Boost Your Brain and Memory)

जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा जॉब करत असाल तर बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी तुम्ही  काही सोपे उपाय करू शकता. स्मरणशक्ती वाढवण्यााठी ताण-तणाव कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह राहणं फार महत्वाचं आहे. डोकं चांगलं चालावे यासाठी तुम्ही खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं.  काही भाज्या आणि फळं  स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (How to Boost Brain Power and Memory)

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटामीन के, सेलेनियम आणि एंटी ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. ब्रोकोलीत ग्लुकोसिनोलेट्स नावाचे संयुगे असात. जे आयसोथियोसाइनेट्सचे उत्पादन करतात. जे ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करतात आणि न्युरोडीजेनेरेटिव्ह डिसॉर्डरची जोखिम कमी करतात.

रोज नाश्त्याला काय खाता? माधुरीचे पती डॉ. नेने सांगतात नाश्ता करण्याच्या ५ टिप्स- निरोगी राहाल

पालक

हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार पालक खाल्ल्याने आरोग्याला पुरेपूर फायदे मिळतात. कारण यात व्हिटामीन ए, ल्युटिन आणि कॅरोटीन यांसारखे एंटीऑक्सिडेंट्स असतात. पालकात फॉलेट आणि व्हिटामीन के असते जे मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असते.

भेंडी

भेंडीत पॉलिफेनोल्स आणि व्हिटामीन बी-६ असते. जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात भेंडी असायला हवी. भेंडीतील लॅक्टिन प्रोटीन कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखतात. भेंडी रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलचा स्तर सुधारण्यास मदत करते.

मनगट बारीक पण दंड जाडजूड झाले? २ व्यायाम-स्लिम होतील दंड, स्लिव्हलेस ड्रेसमध्ये सुंदर दिसाल

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लायकोपीन असते जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. टोमॅटो एंटीऑक्सिडेंट्सचा चांगला स्त्रोत आहे. लायकोपीन आणि बीटाकॅरोटीन यात असते. टोमॅटोमुळे ब्रेन सेल्स डॅमेज होण्याचा धोका टळतो. 

गाजर

बीटा कॅरोटीनसारखे इतर एंटी ऑक्सिडेंट्स मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत राहते.  गाजर, कोबी, खरबूज यांसारख्या भाज्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय बदाम हा सुद्धा चांगला पर्याय आहे. रात्री बदाम भिजवून सकाळी सेवन केल्यास स्मरणशक्ती चांगली राहते आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून निघते.  भरपूर प्रोटीन्स, फायबर्स शरीराला मिळतात.

Web Title: How to Boost Brain Power and Memory : Food For Improve Your Memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.