आजकालच्या जगात यशस्वीपणे वावरायचं असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं खूप खूप गरजेचं आहे. शाळा असो किंवा ऑफिस असो... अगदी विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या मंडळींपर्यंत सगळ्यांनाच असा अनुभव येतो की आपल्याला समोरच्यापेक्षा जास्त येत असतं. पण फक्त ते आत्मविश्वासाने बोलून दाखविण्याची हिंमत आपल्यात नसते, म्हणून आपली संधी हुकते (How to boost confidence?). म्हणूनच आता असं पुन्हा होऊ नये, चारचौघांत ठासून बोलता यावं, यासाठी हा एक सोपा उपाय नियमित करा (How to improve stage courage?). तो उपाय म्हणजे उत्तरबोधी मुद्रा. हळूहळू आत्मविश्वाास एवढा जबरदस्त वाढेल की बघता बघता एखादी सभाही गाजवाल. मुलांसाठीही हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे.(Benefits of Uttarbodhi Mudra )
कॉन्फिडन्स वाढविण्यासाठी उत्तरबोधी मुद्रा
आत्मविश्वास वाढविण्यासाठी उत्तरबाेधी मुद्रा अतिशय फायद्याची ठरते, असे अनेक योगा अभ्यासकांनी सांगितले आहे. उत्तरबोधी मुद्रा कशी करायची ते आता पाहूया.
रोज फक्त ५ मिनिटं कानाला मसाज करा, स्ट्रेस- छातीतली धडधड होईल कमी- पाहा भन्नाट युक्ती
उत्तरबोधी मुद्रा करण्यासाठी सगळ्यात आधी दोन्ही हातांचे अंगठे आणि पहिले बोट वगळता इतर बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आता दोन्ही अंगठ्यांचे वरचे टोक एकमेकांना लावा, तसेच दोन्ही हातांची अनामिकाही एकमेकींना जोडून घ्या. ही मुद्रा दररोज एका मिनिटासाठी तरी नियमितपणे करावी.
वाचन करताना, चारचौघांसमोर बोलताना किंवा शांतपणे बसून काही ऐकत असतानाही तुम्ही ही मुद्रा करू शकता.
उत्तरबोधी मुद्रा करण्याचे फायदे
१. उत्तरबोधी मुद्रा केल्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. चारचौघांत बोलण्याची भीती वाटत नाही.
२. मन आणि शरीर रिलॅक्स करण्यासाठी ही मुद्रा फायदेशीर ठरते.
३. ही मुद्रा नियमित केल्यामुळे एकाग्रता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठीही ती अतिशय फायदेशीर आहे.