Join us  

फक्त एकच व्यायाम, चरबी वितळेल झटपट... कॅलरी बर्नसाठी मलायका अरोरा सांगतेय खास व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 8:10 AM

Exercise For Fat Burn: फॅट्स कमी करायचे आहेत, पण व्यायामाचा कंटाळा येतो, मग हा घ्या त्यावरचा उपाय. कॅलरी बर्नसाठी (calories burn) मलायका अरोरा सांगतेय एकच परफेक्ट व्यायाम...

ठळक मुद्देकॅलरी बर्न होण्यासाठी ती हा व्यायाम दररोज करते. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल, तेवढ्या वेळेस ही स्टेप करावी, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेसविषयी टिप्स देत असते. यामध्ये ती जे व्यायाम सांगते ते खरोखरंच अतिशय उपयुक्त ठरतात, अशा कमेंट्स तिच्या व्हिडिओंना नेहमीच मिळत असतात. आता सुद्धा मलायकाने एक जबरदस्त व्यायाम (exercise) सांगितला आहे. हा एकच व्यायाम तुम्ही नियमितपणे केला तर त्यामुळे शरीराची लवचिकता तर वाढतेच, पण कंबर, पोट, पाय यावरील चरबी कमी (fat and calories burn) करण्यासाठीही उपयोग होतो, असं ती म्हणते आहे.

 

मलायका सांगतेय तो व्यायाम करण्याचे फायदे१. शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते.

२. पोट, कंबर आणि पायांवरील चरबी कमी होते.

पाय सारखेच दुखतात, वेदना सहनच होत नाहीत? करिना कपूरची फिटनेस ट्रेनर सांगतेय ५ योगासनं, पायदुखी कमी

३. ज्यांना व्यायाम करण्यासाठी खूप वेळ नसतो, किंवा व्यायामाचा कंटाळा येतो, त्यांच्यासाठी हा व्यायाम उत्तम आहे. कारण तो केल्याने कमीतकमी वेळांत अधिकाधिक फायदा मिळतो.

४. कार्डिओव्हॅस्कूलर ॲक्टीव्हिटी वाढविण्यासाठी हा व्यायाम उत्तम आहे.

५. कंबर, पाठ, पोट आणि पाय यांच्या स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी उत्तम व्यायाम.

 

कसा व्यायाम करतेय मलायका?१. मलायका अरोरा जो व्यायाम करते आहे यात पहिली स्टेप करताना तिने तिचे दोन्ही तळहात डोक्याला, कानाच्या थोडं मागच्या बाजूला ठेवले आहेत. आणि हात तसेच ठेवून ती एकानंतर एक पाय उचलते आहे. पाय उचलताना ती ते थोडे बाहेरच्या बाजूला आणून गुडघ्यात वाकवून वर उचलते आहे.

केस खूपच पातळ झाले? केमिकल्स असणारे हेअर प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा करा ५ घरगुती उपाय

२. या व्यायामाची जी दुसरी स्टेप आहे, त्यात तिने दोन्ही हात छातीच्या समोर ठेवले आहेत. हातांचे तळवे एकमेकांना जोडले आहेत. आणि दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून ती एका नंतर एक याप्रमाणे वर उचलत आहेत. पाय शक्य तेवढ्या वर उचलण्याचा तिचा प्रयत्न असून ती या दोन्ही स्टेप अतिशय जलद करते आहे.

३. कॅलरी बर्न होण्यासाठी ती हा व्यायाम दररोज करते. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल, तेवढ्या वेळेस ही स्टेप करावी, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाममलायका अरोरा