Lokmat Sakhi >Fitness > झाडू मारा-फरशी पुसा-भांडी घासा- पाहा कोणत्या कामानं किती कॅलरी बर्न होतात, घटवा वजन

झाडू मारा-फरशी पुसा-भांडी घासा- पाहा कोणत्या कामानं किती कॅलरी बर्न होतात, घटवा वजन

How To Burn Calories Without Workout At Home : जेव्हा तुम्ही घरातलं काम करता तेव्हा शरीर एक्टिव्ह राहते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 04:23 PM2024-05-17T16:23:26+5:302024-05-17T17:36:07+5:30

How To Burn Calories Without Workout At Home : जेव्हा तुम्ही घरातलं काम करता तेव्हा शरीर एक्टिव्ह राहते.

How To Burn Calories Without Workout At Home : How Many Calories Burnt By Doing Household Like dusting, washing utensils | झाडू मारा-फरशी पुसा-भांडी घासा- पाहा कोणत्या कामानं किती कॅलरी बर्न होतात, घटवा वजन

झाडू मारा-फरशी पुसा-भांडी घासा- पाहा कोणत्या कामानं किती कॅलरी बर्न होतात, घटवा वजन

जर तुम्हाला जिमला जायला वेळ नसेल किंवा सकाळी उठून जॉनिंगला जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरातलं काम करून आपलं वजन कमी करू शकता. घरातलं कोणतंही काम करून तुम्ही जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करू शकता. ज्यामुळे मसल्स स्ट्राँग होण्यास मदत होईल. (Fitness Tips) जेव्हा तुम्ही घरातलं काम करता तेव्हा शरीर एक्टिव्ह राहते आणि बॉडी एनर्जी खर्च करते. घर आणि गार्डनची कामं केल्याने तुमचा मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. मेटाबॉलिझ्म चांगला राहिल्यानं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (How To Burn Calories Without Workout At Home)

१) वेबएमडीच्या रिपोर्टनुससार जेव्हा तुम्ही संपूर्ण घराची साफसफाई करता तेव्हा वॅक्यूम क्लिनरचा वापर करता तेव्हा अर्ध्या तासात जवळपास ९९ कॅलरीज बर्न होतात.  तेव्हा तुम्ही हाताने लादी पुसता तेव्हा संपूर्ण मसल्स रिलॅक्स होण्यास मदत होते. 

२) जेव्हा तुम्ही साबण आणि पाण्याने डिप क्लिन करता तेव्हा  १३५ ते २०० कॅलरीज कमी होतात. हा व्यायाम  उत्तम आहे. ज्यामुळे कॅलरीज सहज कमी होण्यास मदत होते. 

३) जेव्हा तुम्ही चादर बदलत असता तेव्हा  १८० ते ३०० कॅलरीज बर्न करू शकता. हा सुद्धा एक उत्तम व्यायाम आहे.

दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती? पोटभर खाऊनही वजन वाढणार नाही

४) मुलांसोबत जेव्हा वेळ घालवता  किंवा मुलांची काळजी घेतात तेव्हा संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जर तुम्ही अर्धा तास जरी मुलांसोबत खेळलात तर  १२० ते १८० कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

५) घराच्या आजूबाजूच्या गार्डची साफसफाई करत असाल तर १२० ते  १७८ कॅलरीज कमी होण्यास मदत होते.
जेवल्यानंतर तुम्ही  तुमचे ताट धुवून ठेवा किंवा नंतरची आवराआवर केली तर ३०० कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल.

चालताना मांड्या घासल्या जातात-आग होते? ऋजुता दिवेकर सांगतात १ उपाय; जळजळ होईल दूर

६) जर तुमचा लॉन असेल तर रोज पाणी द्यायला हवं. हे काम करुन तुम्ही १३९ ते २०० कॅलरीज बर्न कर करू दिवसभरातील काम पूर्ण करू शकता आणि फिट राहू शकता. 

Web Title: How To Burn Calories Without Workout At Home : How Many Calories Burnt By Doing Household Like dusting, washing utensils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.