Lokmat Sakhi >Fitness > भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

How To Consume Chana For Weight Loss and more Health Benefits : मधुमेह आणि वेट लॉससाठी 'या' पद्धतीने चणे खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 03:35 PM2024-10-09T15:35:55+5:302024-10-09T15:37:05+5:30

How To Consume Chana For Weight Loss and more Health Benefits : मधुमेह आणि वेट लॉससाठी 'या' पद्धतीने चणे खा..

How To Consume Chana For Weight Loss and more Health Benefits | भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

थंडीच्या दिवसांमध्ये चणे (Harbhara) हमखास खाल्ले जातात (Health Tips). चणे (Chana) खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लहानशी भूक भागवण्यासाठी आपण मुठभर चणे खातो. चण्यांमध्ये असणारे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे आवश्यक पोषक मुबलक प्रमाणात असते (Weight loss). त्यामुळे चणे खाण्याचा सल्ला तज्ज्ञही देतात. पण चणे नेमके कसे खावे? भाजून की शिजवून?

यासंदर्भात, आहारतज्ज्ञ परमीत कौर सांगतात, 'चणे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. चणे हे एक अमीनो ऍसिडचे उत्तम स्त्रोत आहे. जर आपण शाकाहारी असाल, आणि मसल्स बिल्ड करायचं असेल तर, चणे हमखास खा'(How To Consume Chana For Weight Loss and more Health Benefits).

चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

वेट लॉससाठी मदत

चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोट अधिक वेळ भरलेले असते. शिवाय खाल्लेलं व्यवस्थित पचतं. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, मुठभर चणे रोज खा.

दिवसभरात फक्त 'एवढी'च पावलं चाला, वजन कमी होणारच- हृदयही राहील निरोगी -दिसाल फिट

हृदय राहते निरोगी

हरभऱ्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही. शिवाय चणे हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

रक्तातील साखर राहते नियंत्रणात

चण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी कमी असते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. मधुमेही रुग्ण आपल्या आहारात याचा समावेश करू शकतात.

बद्धकोष्ठतेपासून आराम

चण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवण्यास मदत करते. जर आपलं पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर, मुठभर चणे खा.

ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल

भिजलेले चणे खाण्याचे फायदे

आरोग्य तज्ज्ञ भिजलेले चणे खाण्याचा सल्ला देतात. जर आपण नियमित व्यायाम शाळेत जात असाल तर, स्नायूंच्या बळकटीसाठी भिजलेले चणे खाऊ शकता. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी भिजलेले चणे खाणे फायदेशीर ठरू शकते.

भाजलेले चणे खाण्याचे फायदे

भाजलेले चणे खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि ऋतू बदलांनुसार होणारे आजार दूर राहतात. थायरॉईड आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी भाजलेले चणे फायदेशीर ठरते. छोटीशी भूक भागवण्यासाठी आपण भाजलेले चणे खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. 

Web Title: How To Consume Chana For Weight Loss and more Health Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.