बदलत्या लाईफस्टाईलमुळे कमी वयात गंभीर आजार शरीरात उद्भवतात. ज्यात डायबिटिज, हृदयविकाराचा धोका, ब्लड प्रेशर कमी - जास्त होणे, या आजारांचा समावेश आहे. ब्लड प्रेशर कमी - जास्त होणे ही समस्या अनेकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. रक्तातील साखरेची पातळी सतत कमी होत राहिल्यास, किंवा वाढत राहिल्यास अनेक मोठ्या समस्यांचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
काही सोप्या व नैसर्गिक पद्धतींच्या मदतीने, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येईल. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ४ गोष्टी करा. यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी चार गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येईल(How To Control Blood Sugar Levels: 4 Steps).
४ गोष्टींच्या मदतीने रक्तातील साखर नियंत्रित करा
पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांच्या मते, ''हेल्दी ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी शांत झोप घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये चार पद्धतींचा समावेश करा, ज्यामुळे ब्लड शुगर रेगुलेट करण्यास मदत मिळेल.
कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल
कॅमोमाइल चहा
रात्री झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाइल चहा प्या, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅमोमाइल चहा ही एक औषधी वनस्पती आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.
भिजवलेले बदाम
बदामामध्ये भरपूर पोषक असतात. रात्री झोपण्यापूर्वी ७ भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरू शकते. बदामामध्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन असते. ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. भिजवलेले बदाम खाल्ल्यानंतर रात्री भूक देखील लागत नाही.
सुष्मिता सेनचे डॉक्टर सांगतात, व्यायाम आठवड्यातून किती दिवस आणि कधी करावा?
भिजवलेले मेथीचे दाणे
मेथीच्या दाण्यांमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात. जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भिजवलेले मेथीचे दाणे खा, यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
वज्रासन
भारतीय संस्कृतीत निरोगी राहण्यासाठी योगासनाला विशेष महत्त्व आहे. रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटे वज्रासन करा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. नियमित वज्रासन केल्याने ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते, यासह रक्ताभिसरण सुधारते.