Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी करायचे तर ४ पद्धतीने करा पदार्थ, वजन घटेल झरझर

वजन कमी करायचे तर ४ पद्धतीने करा पदार्थ, वजन घटेल झरझर

How to cook food for weight loss : अन्न शिजवण्याच्या प्रक्रीयेवरही वजन कमी होईल की वाढेल हे अवलंबून असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 05:52 PM2023-10-04T17:52:45+5:302023-10-04T17:53:42+5:30

How to cook food for weight loss : अन्न शिजवण्याच्या प्रक्रीयेवरही वजन कमी होईल की वाढेल हे अवलंबून असते

How to cook food for weight loss | वजन कमी करायचे तर ४ पद्धतीने करा पदार्थ, वजन घटेल झरझर

वजन कमी करायचे तर ४ पद्धतीने करा पदार्थ, वजन घटेल झरझर

वजन कमी करण्यासाठी आहारात हेल्दी फुड्स आणि नियमित व्यायाम करणे गरजेचं आहे. पण हेल्दी फुड्स म्हणजे काय? हेल्दी फुड्स खाताना पदार्थ कसे तयार करायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकदा डीप फ्राय करूनही विविध पदार्थ केले जातात. यामुळे पदार्थातील किंवा भाजीतील पौष्टीक मूल्य कमी होते.

डीप फ्राईड फूड खाल्ल्याने वजन तर वाढतेच, शिवाय इतरही गंभीर आजार निर्माण होतात. चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवल्यास, पदार्थातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सची रचना बदलू शकते. त्यामुळे अन्न शिजवताना काही गोष्टी लक्षात ठेवा, व या ४ पद्धतीने अन्न शिजवा. यामुळे नक्कीच वजन होईल कमी, व आरोग्यही सुधारेल(How to cook food for weight loss).

ग्रिलिंग

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, कुकिंगमध्ये ग्रिलिंग ही पद्धत प्रत्येकाला ठाऊक असेल. अनेक पदार्थ ग्रिलिंग करून तयार केल्यास, चवीला भन्नाट लागते. ग्रिलिंग करून अन्न शिजवल्यास त्यातील अतिरिक्त फॅट्स कमी होते. ग्रिलिंग या पद्धतीने अन्न शिजवताना तेलाची गरज भासत नाही. पदार्थातील नैसर्गिक तेलामुळे अन्न शिजते.

व्यायाम-डाएट फॉलो करूनही वजन कमी होत नाही? मग आहारात कराच ४ मसाल्यांचा समावेश

ब्रॉयलिंग

ब्रॉयलिंगमध्ये अन्न शिजवण्याची पद्धत ही काहीशी ग्रिलिंगसारखीच आहे. यामध्ये जाळीवर अन्न ठेवण्यात येते. त्यावर चवीनुसार मसाले लावून, कोळशातून निघणाऱ्या आगीवर किंवा नैसर्गिक उष्णतेवर अन्न शिजवण्यात येते. ब्रॉयलिंग पद्धतीने शिजवलेले अन्न चवीला तर भन्नाट लागतेच, पण आरोग्याच्यादृष्टीनेही फायदेशीर ठरते.

स्टिर-फ्राइंग

वजन कमी करण्यासाठी आपण स्टिर-फ्राइंग पद्धतीने अन्न तयार करू शकता. स्टिर-फ्राइंग करताना आपण खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. या पद्धतीने अन्न शिजवल्याने पदार्थातील पुरेपूर पौष्टीक घटक शरीराला मिळतात.

रोज सकाळी नकळत ५ चुका होतात आणि वजन वाढायला लागते, पाहा नेमके काय चुकते?

स्टीम

स्टीम करूनही आपण अन्न शिजवू शकता. स्टीम या पद्धतीने अन्न शिजवल्याने पदार्थांमधील असलेले पोषक तत्व कमी होत नाही, व स्टीम केलेले पदार्थ पचायला देखील हलके असतात. पदार्थ स्टीम करताना तेलाची गरज भासत नाही. स्टीम केलेले पदार्थ खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Web Title: How to cook food for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.