तब्येत चांगली राहण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. खाण्यापिण्यातील पदार्थांतून आपल्या पोषण मिळतेय की नाही हे पाहणं महत्वाचं असतं. चुकीची लाईफस्टाईल, आजारपण यांमुळे शरीर कमकुवत होऊ शकतं. ही संपूर्ण सिस्टिम रिसेट करण्यासाठी डिटॉक्सिफिकेशनची गरज असते. (Detoxification) औषधांच्या मदतीनं किंवा नॅच्युरल डिटॉक्स पद्धतीनं तुम्ही शरीरातील विषारी घटक बाहेर काढू शकता. (5 Effective Tips To Naturally Detox Your Body) पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी सांगितले की नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेलं डिटॉक्ट ड्रिंक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. घरगुती डिटॉक्स वॉटरमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. (How to detox body)
धण्याचं पाणी
धण्याच पाणी हे नैसर्गिक डिटॉक्सिफायरच्या स्वरूपात काम करते. या पाण्याचे सेवन केल्यास मुत्राच्या माध्यमातून शरारीतले सगळे विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय इंन्सुलिनचं उत्पादन वाढतं. लिव्हर हेल्दी राहतं आणि मेटोबॉलिझ्म कंट्रोल करण्यास मदत मिळते. १ चमचा धण्याचं पाणी एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवण्यासाठी ठेवा १० मिनिटांनंतर हे पाणी उकळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा.
सफरचंद आणि दालचिनीचं पाणी
हे पाणी मेटाबॉलिझ्म बूस्टरप्रमाणे काम करतं. सफरचंद, दालचिनी एंटीऑक्सिडेंटस आणि फ्लेवोनोइड्सचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. रक्त्तातील साखर नियंत्रणात राहते. हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो. याशिवाय या असलेले पोषक तत्व शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यात मदत करतात. एक ग्लास पाण्यात सफरचंदाचे काही तुकडे आणि १ दालचिनी घालून काही तास तसंच ठेवा नंतर या पाण्याचे सेवन करा.
काकडी लिंबू
काकडी लिंबापासून तुम्ही एक पॉवरफूल ड्रिक बनवू शकता. एक एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. यामुळे विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. याशिवाय इम्युनिटी वाढते. काकडीत ९६ टक्के पाणी असते यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय वचनक्रियाही चांगली राहते.
स्ट्रोबेरी आणि लिंबू
तज्ज्ञ सांगतात की शरीर डिटॉक्स करण्यासाठी पाण्यात स्ट्रोबेरी आणि लिंबाचा रस मिसळा. स्ट्रोबेरी आणि लिंबाचा रस मिसळून पिणं फायदेशीर ठरतं. स्ट्रोबेरीत एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळे इंसुलिनचा स्तर मेंटेन राहतो. याशिवाय पचनक्रियाही चांगली राहते. शरीराची पीएच लेव्हलसुद्धा संतुलित राहते.
जिऱ्याचं पाणी
जिऱ्यात एंटी ऑक्सिडेंटस आणि एंटी मायक्रोबिअल औषधी गुणधर्म असतात. यामुळे शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. याशिवाय मेटोबॉलिझ्म वाढतो आणि हार्मोनल कंट्रोल राहते. वजन कमी करण्यसासुद्धा या पाण्याचे सेवन फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा जिरे 1 ग्लास पाण्यात भिजवा. हे पाणी सकाळी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा.