Join us  

पावसामुळे चालायला- पळायला किंवा सायकलिंगला जाता येत नाही? घरातच करा कार्डिओ वर्कआऊट, व्यायाम चुकणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 8:38 PM

Cardio Exercises: पावसामुळे जीममध्ये जाऊन रेग्युलर वर्कआऊट (regular workout) करणं शक्य होत नसेल तर त्यासाठी घरच्याघरी कसा व्यायाम करता येईल, याविषयीचा एक खास सल्ला देत आहे अभिनेत्री भाग्यश्री (actress Bhagyashree).

ठळक मुद्देहा व्यायाम एक चांगल्या प्रकारचं कार्डिओ वर्कआऊट असून त्यामुळे पायांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते, असंही भाग्यश्रीने सांगितलं. 

जीम, योगा क्लास, झुंबा क्लास किंवा वॉकिंग, सायकलिंग असा कोणताही घराबाहेर जाऊन करण्याचा जो व्यायाम असतो, त्या व्यायामात पावसाळ्यात (monsoon) खंड पडतोच. सध्या तर रोजच पाऊस पडतो आहे, त्यामुळे अनेकांना घराबाहेर जाऊन व्यायाम करणं शक्य होत नाही. काही जणांना व्यायाम टाळण्यासाठी पाऊस येणं हवंहवंसं वाटतं. पण काही नियमित व्यायाम (workout) करणारे मात्र त्यामुळे पार वैतागून जातात. आता यापैकी तुम्ही जर दुसऱ्या प्रकारातले असाल आणि पावसामुळे व्यायामात (cardio workout) पडणारा खंड तुम्हाला नकोसा वाटत असेल, तर भाग्यश्री सांगतेय तो व्यायाम करून बघायला हरकत नाही.

 

कोणता व्यायाम करतेय भाग्यश्री?भाग्यश्रीने तिचा कार्डिओ वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. अर्थात आता यात ती जो व्यायाम प्रकार करून दाखवते आहे, त्यासाठी खास उपकरणांची गरज आहे. व्यायाम करण्यासाठी तिच्याकडे जसा तो बाऊसिंग बॉल आहे, तसा सगळ्यांकडेच असणं शक्य नाही. पण तुम्हाला जर असा व्यायाम करायचाच असेल तर यावर एक घरगुती तोडगा शोधून काढता येऊ शकतो. हा व्यायाम करण्यासाठी तुमच्या तळपायांना मऊसर लागेल आणि थोडंसं बाऊन्स होईल, असं काही आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही एकावर एक २- ३ उशा ठेवून हा व्यायाम करू शकता किंवा मग गादीची गुंडाळी करून त्यावरही हा व्यायाम करू शकता. हा व्यायाम एक चांगल्या प्रकारचं कार्डिओ वर्कआऊट असून त्यामुळे पायांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते, असंही भाग्यश्रीने सांगितलं. 

 

घरच्याघरी करता येणारे कार्डिओ व्यायामभाग्यश्रीने सांगितलेलं कार्डिओ वर्कआऊट घरच्याघरी करणं शक्य नसेल तर हे इतर काही व्यायाम तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांत नक्कीच करू शकता. १. जंपिंग जॅकसंपूर्ण शरीराचा व्यायाम घडवून आणणारं हे एक उत्तम कार्डिओ वर्कआऊट आहे. घरच्याघरी तुमच्या क्षमतेनुसार २५ ते ५० जंपिंग जॅक केले तरी भरपूर फायदा होतो. हातांच्या तसेच पायांच्या स्नायुंची ताकद वाढविण्यासोबतच वेटलॉस करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम मानला जातो.

 

२. सुर्यनमस्कार.इतर हेवी कार्डिओ वर्कआऊट बघता सुर्यनमस्काराचा व्यायाम हा सौम्य स्वरुपाचा वाटू शकतो. पण सुर्यनमस्कार हा एक अतिशय चांगले कार्डिओ वर्कआऊट आहे. हृदय, रक्तवाहिन्या यासोबतच संपूर्ण शरीरातील स्नायूंना मोकळं करून शरीर फिट ठेवण्यासाठी हा एक चांगला व्यायाम आहे.

 

३. दोरीवरच्या उड्या..जीममध्ये जाऊन हेवी कार्डिओ वर्कआऊट केल्यानंतर जो फायदा मिळतो, तोच व्यायाम दोरीवरच्या उड्या मारूनही मिळतो. त्यामुळे पावसामुळे जीमला जाणं शक्य नसेल तर कार्डिओ वर्कआऊटसाठी घरच्याघरी तुमच्या क्षमतेप्रमाणे दोरीवरच्या उड्या मारल्याने निश्चितच फायदा होऊ शकतो. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्यव्यायामभाग्यश्रीयोगासने प्रकार व फायदे