लहानपणी आपण सर्वांनी खेळाच्या तासात भरपूर धम्माल मस्ती नक्कीच केली असेल. या खेळाच्या तासात मस्तीसह शारीरिक व्यायामही व्हायचा. यामुळे फिटनेस म्हणजे काय? शारीरिक हालचाल का महत्वाची? उत्तम आरोग्यासाठी व्यायाम का महत्वाचा? या गोष्टी समजून घेण्यासाठी ट्रेनर किंवा खेळाच्या तासाचे सर मदत करायचे.
अनेकांनी खेळाच्या तासात जंपिंग जॅक केलं असेल. जंपिंग जॅक करण्यासाठी आपल्याला विशेष कोणत्याही उपकरणांची गरज नाही. फक्त उड्या मारून हा व्यायाम केला जातो. जंपिंग जॅक केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. जर आपल्याला फुल बॉडी वर्कआउट करायचं असेल तर, जंपिंग जॅक हा व्यायाम आपल्याला वजन कमी करण्यास मदत करू शकते(How to Do Jumping Jacks for Weight Loss).
जंपिंग जॅक हा व्यायाम कसा करायचा?
जंपिंग जॅक हा व्यायाम अतिशय फायदेशीर आहे. हा व्यायाम नियमित केल्याने वजन वेगाने कमी होते. हा व्यायाम करण्यापूर्वी हाता-पायांचा हलकाफुलका स्ट्रेचिंग व्यायाम करावा. ज्यामुळे हा व्यायाम करताना कोणतीही इजा होणार नाही. नंतर सरळ उभे राहा. उडी मारताना दोन्ही हात वर न्या. पाय जमिनीवर आणताना थोडे पाय पसरवा. हा व्यायाम एक ते दीड मिनिटे करा, २ मिनिटांचा ब्रेक घेऊन पुन्हा हा व्यायाम करा.
वजन कमी करायचे तर ४ पद्धतीने करा पदार्थ, वजन घटेल झरझर
हृदयाचे आरोग्य चांगले राहते
जंपिंग जॅक हा एरोबिक कार्डिओ व्यायाम आहे. हा व्यायाम केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वाढते, खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाच्या संबंधित समस्या दूर होते.
मसल्स टोन्ड होतात
शरीराची चरबी बर्न झाल्यानंतर स्किन अनेकदा लटकलेली दिसून येते. नियमित जंपिंग जॅक केल्याने चरबी जाळण्यास मदत होते. यासह स्नायूंचे टोनिंगही होते. नितंब, मांड्या, खांदे आणि हात यांना परिपूर्ण आकार मिळतो.
जिम की मॉर्निंग वॉक? कशाने लवकर वजन कमी होते? आरोग्यासाठी काय फायद्याचं?
वजन कमी करण्यास मदत
नियमित जंपिंग जॅक केल्याने वेट लॉस होते. हा एक कार्डिओ व्यायाम आहे. ज्यामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते. यासह शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. जर आपण वेट लॉस करण्याच्या विचारात असाल तर, नियमित २ मिनिटे जंपिंग जॅक करा.
स्ट्रेसपासून मुक्ती
जंपिंग जॅक केल्याने तणाव दूर होण्यास मदत होते. जेव्हा आपण उडी मारतो. तेव्हा आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होते. शिवाय हा व्यायाम करताना आपला हात वर-खाली होतो. अशा वेळी मेंदू सेरोटोनिन किंवा "फील गुड" हार्मोन्स सोडते. ज्यामुळे हा व्यायाम करताना आपला उत्साह वाढतो. नियमित हा व्यायाम केल्याने तणावाची पातळी कमी होते, व आपल्याला आनंदी वाटते.