पातळ कंबर आणि टोन्ड एब्ज मिळवण्यासाठी अनेकजण जीमला जातात. (Health Tips) पण सर्वांनाच जीमला जाणं शक्य होतंच असं नाही. (Fitness Tips) घरच्याघरी अगदी कमी वेळात सोपी योगासनं करून तुम्ही तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकतात. खूप कमी लोक असे असतात जे शरीर रिलॅक्स करण्यासाठी व्यायाम आणि योगासनांचा आधार घेतात. (Weight Loss Tips) रोजच्या जीवनशैलीत काही सोप्या व्यायाम प्रकारांचा समावेश करून तुम्ही टोन्ड एब्स आणि मनासारखा बॉडी शेप मिळवू शकता. माईंडफुलनेल एंड बियोंडचे फाऊंडर श्री सर्वेश यांच्या म्हणण्यानुसार सुडौल एब्स हवे असतील तर सोप्या योगासनाने दिवसांची सुरूवात करा. (How to do Triangle Pose)
त्रिकोणासन कसे करावे? (How to do Trikonasana)
त्रिकोणासन हे अगदी सोपं योगासन आहे. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी एका योगा मॅटवर उभं राहा. या दरम्यान आपल्या पायांच्या मध्ये २ फुटांचे अंतर ठेवा. त्यानंतर हात शरीराच्या बाजूला ठेवा. त्यानंतर तुमचे दोन्ही हात पसरवा. नंतर श्वास आतल्या बाजूने ओढत नंतर डावा हात उचलून कानांजवळ आणा. त्यानंतर डावा पाय बाहेरच्या बाजूला दुमडा. त्यानंतर श्वासांना बाहेर सोडत डावे हात कानांना जोडा. नंतर पुन्हा हात खाली करा. ३० सेकंद याच स्थितीत राहा. नंतर पुन्हा पूर्वस्थितीत या.
त्रिकोणासन करण्याचे फायदे (Benefits Of Trikonasana)
1) फार्मइज.कॉमच्या रिपोर्टनुसार त्रिकोणासन नियमित केल्यास कंबरेच्या वेदनांपासून आराम मिळतो. यामुळे शरीर लवचीक बनते. याशिवाय कंबरदुखीच्या वेदनाही जाणवत नाहीत.
सकाळी चालता तरी पोट जसच्या तसंच? डॉक्टर सांगतात वॉकनंतर ५ गोष्टी करा-लवकर स्लिम व्हाल
2) त्रिकोणासन योगा केल्याने चिंता, ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. हा योगा प्रकार केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मूड चांगला राहण्यासही मदत होते. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. हा योगाप्रकार केल्याने ताण-तणावही कमी होतो.
3) पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी त्रिकोणासन फायदेशीर ठरतं. हे योगा प्रकार केल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर होते आणि शरीराला एनर्जी मिळते. नियमित हे योगासन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. डायजेस्टिव्ह ग्लँड्स फायदे मिळतात.
4) त्रिकोणासन नियमित केल्याने आपल्या मांसपेशी मजबूत राहतात. हे योगाप्रकार केल्यानं शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. हे आसन केल्याने मांड्या आणि नितंबांवरील दबाव कमी होतो. हे आसन करण्यासाठी बॉडी पोस्चर योग्य असावे लागते. नियमित त्रिकोणासन केल्याने त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवत नाही. हे आसन केल्याने त्वचेवर ग्लो येतो. पिंपल्स येत नाही आणि त्वचा ग्लोईंग राहते.
शरीराला आतून पोकळ बनवते व्हिटामीन B-१२ ची कमतरता; रोज ५ पदार्थ खा, B-१२ वाढेल
5) त्रिकोणासन केल्याने उंचीसुद्धा वाढवता येते. खासकरून वाढत्या वयात हे आसन नियमित करण्याचा सल्ला दिला जातो. वाढत्या वयात हे योगासन केल्यास तब्येतीला बरेच फायदे मिळतात.
6) फुफ्फुसं निरोगी राहण्यासाठी त्रिकोणासन फायदेशीर ठरते. हा योगा प्रकार करताना अधिकाधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. ज्यात फुफ्फुसांचाही व्यायाम होतो आणि ते मजबूत राहतात.
7) डायबिटीस कंट्रोलसाठी त्रिकोणासन हा उत्तम आहे. हा योगाप्रकार केल्यास टाईप १ आणि टाईप २ डायबिटीज नियंत्रणात राहतं तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर नियमित हा व्यायाम करा.