Join us  

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 6:46 PM

Water Drinking Habits And Practices You Must Follow : पाणी पिण्याचे काही नियम आहेत, जे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहेत. नक्की कोणते आहेत पाणी पिण्याचे ते खास नियम ?

'पाणी पिणे' हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पाणी पिण्यावर आपल्या संपूर्ण शरीराचे चक्र अवलंबून असते. पाणी शरीराच्या अवयवांचे आणि ऊतींचे संरक्षण करते आणि शरीरातील पेशींना पोषक आणि ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. दररोज मुबलक पाणी पिण्याने रोगांशी लढण्यास मदत होते,  म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाण्याची खूप गरज भासते. या पृथ्वीवरील कोणताही सजीव पाण्याशिवाय राहू शकत नाही. आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासते.    

आपल्यापैकी बहुतेक लोकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहित नसते. यामुळे चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो.  अनेकदा आपण उभे राहून अगदी जलद गतीने पाणी पितो. असे केल्याने लघवीद्वारे पाणी बाहेर येते, त्यामुळे शरीराला आवश्यक घटक मिळत नाहीत. तसेच, एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, कारण शरीराला पाण्यावर प्रक्रिया करण्यास वेळ लागतो. तसेच जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. यामुळे मेंदूच्या पेशी आणि शरीरात जळजळ होऊ शकते. पाणी पिण्याचे काही नियम आहेत, जे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहेत(Water Drinking Habits And Practices You Must Follow).

पाणी पिण्याचा आहे खास नियम... 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याचा एक खास नियम सांगितला आहे. आयुर्वेदानुसार पाणी नेहमी सावकाश प्यावे आणि एक - एक घोट घेत घेत प्यावे. पाणी पिताना एक - एक घोट घेत पाणी प्यायल्याने आपल्या तोंडात असलेली लाळही पोटात जाते आणि पचनक्रिया अगदी सुरळीत पद्धतीने कार्य करते. चांगले पचन, हायड्रेशन आणि वजन कमी करण्यासाठी हळूहळू घोट - घोट करून पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

होलिस्टिक हेल्थ अँड वेलनेस कोच श्वेता गुप्ता पाणी पिण्याचे नियम व योग्य पद्धत सांगताना सल्ला देतात की, पाणी पिताना ते हळुहळु घोट घोट घेत प्यावे. पाणी पिताना ते लगेच तोंडात घेऊन गिळू नका त्याऐवजी हळुहळु प्यावे. पाणी पिताना ते एक एक घोट तोंडात घेऊन हळुहळु प्यावे, अशा सोप्या पद्धतीने पाणी प्यायल्यास आपल्या आरोग्याला योग्य पद्धतीने पाणी पिण्याचे फायदे मिळतात. 

रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...

आयुर्वेदानुसार योग्य पद्धतीने पाणी पिण्याचे ३ फायदे सांगितले आहेत... 

१. पचनशक्ती मजबूत होते :- योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने आपल्या तोंडात असलेली लाळ पोटात जाते त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. तसेच, लाळेमध्ये नैसर्गिक अल्कधर्मी गुणधर्म असतात,  ते पाण्यात मिसळतात. त्यामुळे अन्नाचे विघटन आणि पचन होण्यास मदत होते. याशिवाय पाणी हळूहळू तोंडात ठेवून प्यायल्याने अन्न पचण्यास सोपे जाते.

२. शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते :- उन्हाळ्यात कित्येकवेळा आपले शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे तोंडात पाणी धरून हळू हळू प्यायल्याने आपल्या शरीरात पाणी चांगले शोषण्यास मदत होते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या टाळता येते. याशिवाय डिहायड्रेशनचा शरीरावर तसेच मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा प्रकारे पाणी पिणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

३. वाढते वजन कमी करण्यासाठी मदत करते :- पाणी केवळ शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करत नाही तर वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. घोट घोट करुन पाणी प्यायल्याने जास्त भूक लागत नाही, त्यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.  

सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

पुरेसे पाणी पिण्याचे इतर फायदे :- 

१. स्नायूंना मजबूत बनवते.२. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.३. शरीरातील विषारी घटक काढून टाकतात.४. आपल्याला शारीरिक उर्जेने परिपूर्ण ठेवते.५. चयापचय प्रक्रिया मजबूत करते.६. त्वचेवर चमक आणते.७. वृद्धत्व आणि सुरकुत्या कमी करते.८. निर्जीव केसांना नवजीवन देते.९. युरिन इन्फेक्शन दूर करते.१०. किडनी निरोगी ठेवते.

टॅग्स :फिटनेस टिप्स