आहारात भाज्यांचा समावेश असावा असे तज्ज्ञ सांगतात. बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात. प्रत्येक भाजीतील विशिष्ट गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. सिमला मिरची, ज्याला आपण ढोबळी मिरची (Capsicum) देखील म्हणतो. सिमला मिरची खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. ढोबळी मिरची लाल, पिवळी, आणि हिरव्या रंगांमध्ये मिळते. पण आपल्याला माहितीय का, सिमला मिरची वजन कमी करण्यासाठी देखील मदत करते. जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध सिमला मिरची खाण्याचे फायदे किती? यामुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?
एनसीबीआयच्या एका स्टडीनुसार, 'आहारात सिमला मिरची असल्याकारणामुळे मेटाबॉलिक हेल्थ सुधारते. जे वजन वाढीच्या समस्येपासून त्रस्त आहे, त्यांनी आपल्या आहारात सिमला मिरचीचा समावेश करावा. यामुळे पोट दीर्घकाळ गच्च भरलेले राहते'(How To Eat Capsicum For Weight Loss).
कॅलरीज कमी करण्यासाठी उपयुक्त
वजन कमी करताना कॅलरीज डेफिसिटवर विशेष लक्ष दिले जाते. आहारतज्ज्ञ देखील वेट लॉस दरम्यान कॅलरीजयुक्त पदार्थ खाणं टाळण्यास सांगतात. जर आपण वेट लॉस करत असाल तर, आहारात सिमला मिरचीचा समावेश करा. सिमला मिरची खाल्ल्याने कॅलरीज वाढत नाही व, लवकर भूकही लागत नाही.
नाश्ता सोडल्याने वजन कमी होते? तज्ज्ञ सांगतात, ब्रेकफास्ट स्किप केल्याने वजन कमी होईलही पण..
हाय फायबर फूड
सिमला मिरचीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न लवकर पचते. जर आपल्याला कॅलरीज इनटेक कमी करायच्या असतील. पण वारंवार भूक लागत असेल तर, आहारात सिमला मिरचीचा समावेश करा. यामुळे वजन तर कमी होतेच, शिवाय पोटातील चरबीही कमी होते.
व्हिटॅमिन सीने समृद्ध
सिमला मिरचीमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि खनिजे आढळतात. मुख्य म्हणजे सिमला मिरची हे व्हिटॅमिन सी चे उत्तम स्त्रोत आहे. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते.
लवकर भूक लागत नाही
सिमला मिरचीमध्ये कॅप्सेसिनसारखे घटक आढळतात. जे चयापचय दर वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे शरीरातील चरबी जलद गतीने कमी करण्यास मदत होते. जर आपल्याला वारंवार भूक लागत असेल तर, आहारात सिमला मिरचीचा समावेश करा.
गव्हाच्या पिठांत मिसळा ३ प्रकारची पिठं, वजन होईल झरझर कमी- खा चपाती बिंधास्त
सिमला मिरची खाण्याचे इतर फायदे
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध
डोळ्यांसाठी फायदेशीर
शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत
मधुमेहग्रस्त लोकांसाठी फायदेशीर
व्हिटॅमिनसह प्रोटीन्सने परिपूर्ण.