असे खूप लोक आहेत ज्यांना रोज रात्री अंथरूणात पडल्या पडल्या झोप येत नाही. झोप न आल्यानं त्यांच्या तब्येतीवरही गंभीर परिणाम होतो. यामुळेच लठ्ठपणा, हृदयासंबंधी आजार यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. लवकर झोप येण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण त्याचा काही उपयोग होत नाही. उन्हाळ्यात जास्त घाम आल्यानं कधी झोप लागत नाही तर अनेकदा डास रात्रीची झोप खराब करतात. या लेखात तुम्हाला काही नैसर्गिक टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही झोपेची गुणवत्ता सुधारू शकता. (Follow these natural tips deep sleep will come in seconds)
खोलीचं तापमान सेट करा
झोपताना आपल्याला खोलीतील तापमान जास्त गरम किंवा थंड असू नये याची काळजी घ्या. तुम्हाला जास्त घाम येणार नाही याची काळजी घ्या. खोलीतील तापमान व्यवस्थित असल्यास रात्री झोप लागण्यास अडचण येणार नाही.
नसांना चिकटलेले घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ फळं; रोज खा, गंभीर आजारांपासून लांब राहाल
फुट मसाज
चांगल्या झोपेसाठी फूट मसाज आवश्यक आहे. मसाज करण्यासाठी तुम्ही कॅमोमाईल ऑईलचा वापर करू शकता. कॅमोमाईल तेलानं मसाज केल्यास तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि चांगली झोपही येईल. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
इसेंशियल ऑईल
एसेंशियल ऑईलनं मसाज केल्यामुळे शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते. यामुळे एंग्जायटी लेव्हल कमी होते. मूड चांगला राहतो आणि झोपही चांगली येते. यासाठी तुम्ही लेव्हेंडर तेलाचा वापर करू शकता.
फोन लांब ठेवा
अनेकांना रात्री उशीरापर्यंत फोन वापरण्याची सवय असते. लोक झोपायला जातात पण जवळपास १ ते २ तास फोन वापरतात. स्मार्टफोनचा अति वापर केल्यानं स्लिप सायकल खराब हो शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार झोपण्याच्या एक तास आधी फोनचा वापर करू नये.
दिवसभरातून कितीवेळा चेहरा धुता? तज्ज्ञांनी सांगितली स्किन टाईपनुसार चेहरा धुण्याची योग्य पद्धत
पुस्तक वाचा
जर झोप येत नसेल तर कोणतंही पुस्तक वाचत बसा यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल. आजूबाजूला घड्याळ ठेऊ नका, ते बघून झोपेचा त्रास होतो आणि प्रत्येक वेळी मिनिटाचा हिशोब मनात चालू लागतो. झोपा आणि तुमच्या पापण्या वारंवार मिचकावा. तुमचे डोळे थकतील आणि तुम्हाला लवकर झोप लागेल.