Lokmat Sakhi >Fitness > रोज १० मिनीटे-४ सोपे व्यायाम, ओघळलेले स्तन होतील सुडौल-ब्रेस्ट लिफ्टींगसाठी करा फक्त इतकंच..

रोज १० मिनीटे-४ सोपे व्यायाम, ओघळलेले स्तन होतील सुडौल-ब्रेस्ट लिफ्टींगसाठी करा फक्त इतकंच..

How To Fix Saggy Breasts Easy Exercises For Sagging Breast : काही सोपे व्यायामप्रकार केल्यास सैल झालेले स्तन पुन्हा सुस्थितीत येण्यास मदत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 06:01 PM2024-10-15T18:01:25+5:302024-10-15T18:53:35+5:30

How To Fix Saggy Breasts Easy Exercises For Sagging Breast : काही सोपे व्यायामप्रकार केल्यास सैल झालेले स्तन पुन्हा सुस्थितीत येण्यास मदत होते.

How To Fix Saggy Breasts Easy Exercises For Sagging Breast : 10 minutes daily-4 easy exercises, do it for breast lifting.. | रोज १० मिनीटे-४ सोपे व्यायाम, ओघळलेले स्तन होतील सुडौल-ब्रेस्ट लिफ्टींगसाठी करा फक्त इतकंच..

रोज १० मिनीटे-४ सोपे व्यायाम, ओघळलेले स्तन होतील सुडौल-ब्रेस्ट लिफ्टींगसाठी करा फक्त इतकंच..

स्तन हा महिलांच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा अवयव. बांधा सुडौल दिसण्यासाठी स्तनांची बांधणी चांगली असणे अतिशय आवश्यक असते. पण कधी हे स्तन खूप लहान तर कधी खूप मोठे असतात. ही ठेवण आपल्या हातात नसते. मात्र ओघळणारे स्तन आपल्या सौंदर्यात बाधा आणतात. इतकंच नाही तर आरोग्यासाठीही ते चांगलं नसतं. स्तनांच्या अशा ठेवणीला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कधी ब्रेसियर उशीरा वापरण्यास सुरुवात केल्यामुळे तर कधी लठ्ठपणामुळे, कधी ब्रेस्ट फिडींगमुळे तर कधी आणखी काही कारणांनी स्तन सैल पडतात. एकदा हे स्तन सैल पडले की ते ताठ होण्यासाठी काय करावे आपल्याला कळत नाही (How To Fix Saggy Breasts Easy Exercises For Sagging Breast). 

अनेक मुलींमध्ये तर या कारणामुळे आत्मविश्वासही कमी होतो. पण काही सोपे व्यायामप्रकार केल्यास सैल झालेले स्तन पुन्हा सुस्थितीत येण्यास मदत होते. नियमितपणे काही सोपे व्यायामप्रकार केल्यास ओघळलेले स्तन पुन्हा सुस्थितीत येण्यास मदत होते. स्तन मुळात चरबीयुक्त असल्याने त्यांचे वजन थोडे जास्त असण्याची शक्यता असते. पण त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या स्नायुंचा व्यायाम केल्याने स्तनांची ठेवण सुधारण्यास मदत होते. या व्यायामांमुळे खांदे आणि छातीच्या स्नायूंमध्ये ताकद येते आणि त्यामुळे ब्रेस्टला चांगला आधार मिळण्यास मदत होते.यासाठी कोणते व्यायामप्रकार करायचे पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. दोन्ही हात छातीच्या जवळ जमिनीला समांतर घ्यायचे आणि बाजूला ताणायचे. यामुळे छातीच्या आजुबाजूच्या स्नायुंचा चांगला व्यायाम होण्यास मदत होते. किमान ४० ते ५० वेळा हा व्यायामप्रकार केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात. 

२. नंतर हात कोपऱ्यात दुमडायचे आणि खाली छातीच्या बाजुला आपटायचे. यामुळेही चांगला व्यायाम होतो आणि ओघळलेले स्तन थोडे नीट होण्यास मदत होते. श्वास घेत आणि सोडत जोरजोरात हा व्यायामप्रकार करायाल हवा. दिवसातून २ वेळा हे व्यायामप्रकार करायला हवेत.

३. दोन्ही हात छातीच्या रेषेत सरळ एकमेकांना चिकटवायचे आणि तसेच बाजूला करुन खांद्यातून पूर्ण बाहेर ताणायचे. न चुकता रोज हे सगळे व्यायामप्रकार केले तर त्याचा निश्चितच चांगला उपयोग होऊ शकतो. 

४. याचप्रमाणे हात वर खाली करण्याच्या व्यायामाचाही खांदे, स्तन, मान याठिकाणच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो. किमान १ महिना सलग हे व्यायाम केल्यास निश्चितच फायदेशीर ठरतात. 


Web Title: How To Fix Saggy Breasts Easy Exercises For Sagging Breast : 10 minutes daily-4 easy exercises, do it for breast lifting..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.