Lokmat Sakhi >Fitness > स्तन ओघळलेत? सैल झाल्यासारखे वाटतात; सुडौल, मेंटेन फिगरसाठी घरीच करा ४ सोपे व्यायाम

स्तन ओघळलेत? सैल झाल्यासारखे वाटतात; सुडौल, मेंटेन फिगरसाठी घरीच करा ४ सोपे व्यायाम

How To Fix Saggy Breasts : ब्रा स्तनांसाठी सपोर्टप्रमाणे काम करते. ज्यावेळी तुम्ही ब्रा घालत नाही तेव्हा सपोर्ट नसल्यानं स्तन सैल दिसतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:38 PM2023-02-04T13:38:19+5:302023-02-04T13:42:02+5:30

How To Fix Saggy Breasts : ब्रा स्तनांसाठी सपोर्टप्रमाणे काम करते. ज्यावेळी तुम्ही ब्रा घालत नाही तेव्हा सपोर्ट नसल्यानं स्तन सैल दिसतात.

How To Fix Saggy Breasts : Easy exercises to do at home for a toned figure How To Fix Saggy Breasts? Best Breast Lift Exercises | स्तन ओघळलेत? सैल झाल्यासारखे वाटतात; सुडौल, मेंटेन फिगरसाठी घरीच करा ४ सोपे व्यायाम

स्तन ओघळलेत? सैल झाल्यासारखे वाटतात; सुडौल, मेंटेन फिगरसाठी घरीच करा ४ सोपे व्यायाम

आपण कॉन्फिडंट, सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. सुंदर चेहऱ्याबरोबरच आपली फिगर मेंटेन असावी अशी प्रत्येकीची इच्छा असते. म्हणून जरा कपड घट्ट व्हायला लागले की थोडं टेंशनच येतं. स्तन महिलांच्या सौंदर्यातील एक महत्वपूर्ण अवयव असून वाढत्या वयात स्तनांमध्ये अनेक बदल होतात. (Saggy Breasts) स्तन लूज झाल्यासारखे ओघळल्यासारखे वाटतात.  यामुळे बॉडी फिटींग कपडे घालता येत नाहीत नेहमी लूज कपडे घालावे लागतात. स्तन ओघळू नयेत म्हणून काही सोप्या टिप्स पाहूया. (How To Fix Saggy Breasts? Best Breast Lift Exercises)

डॉक्टर तनाया सांगतात, ''स्तन सैल होणं हे अत्यंत सामान्य आहे. यात काळजी करण्यासारखं काहीही नाही.  छाती जराही वजनदार असेल तर स्तन ओघळू लागतात. तुमचे स्तन मध्यम किंवा मोठ्या आकाराचे असतील तर १०० टक्के ते ओघळल्यासारखे दिसतील. गुरुत्वाकर्षामुळे जास्त वजनदार असलेले स्तन खाली ओघळतात. ब्रा स्तनांसाठी सपोर्टप्रमाणे काम करते. ज्यावेळी तुम्ही ब्रा घालत नाही तेव्हा सपोर्ट नसल्यानं स्तन सैल दिसतात.''

स्तन ओघळू नयेत म्हणून कोणते व्यायाम करावेत

१) चेअर डीप एक्सरसाईज

हा व्यायाम करण्यासाठी खर्ची किंवा टेबलची आवश्यकता असते. त्यावर दोन्ही हात ठेवून फोटोत दाखवल्याप्रमाणे आधी खालच्या बाजूला जाऊन वर या. त्यानंतर वीस रिपेटेशन्स ३ वेळा करा. 

२) वॉल पुशअप्स

एखाद्या भिंतीवर  दोन्ही हात ठेवून हातांनी भिंतीला पूश करा आणि मागे या. हा व्यायाम करताना तुमच्या बायसेप्सवर प्रेशर येईल असे पाहा.

३) सुपरमॅन

 हा व्यायाम खूपच सोपा आहे. सगळ्यात आधी मॅट घालून पोटावर झोपा. फोटोत दाखवल्याप्रमाणे आपले हात वरच्या बाजूनं स्ट्रेट करा त्यानंतर पायही वरच्या दिशेनं सरळ पसरवा. यामुळे मसल्स ताणले जातात आणि शरीर अधिक मजबूत होते. 

४) धनुरासन

या व्यायामात  मुद्रा धनुष्याप्रमाणे असते. म्हणून या व्यायाम प्रकाराला धनुष पोज असं म्हणतात. या व्यायाम प्रकारानं स्तन चांगले दिसण्यास मदत होते. याशिवाय धनुरासन नियमित केल्यानं अस्थमाचा त्रास कमी होतो.  या व्यायामात पोटावर झोपल्यानंतर तुम्हाला दोन्ही हातांच्या मदतीनं पाय खेचावे लागतील.

Web Title: How To Fix Saggy Breasts : Easy exercises to do at home for a toned figure How To Fix Saggy Breasts? Best Breast Lift Exercises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.