थकवा, कमकुवतपणा आला की काय खावं आणि काय खाऊ नये असं होतं. ताकद वाढवण्यासाठी काय खावे अशा प्रश्न अनेकदा विचारला जातो. (Healthy Ways To Gain Weight) आयुर्वेदीक औषधं थकवा आणि कमकुवतपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. अधिकाधिक लोक पुरूष असो किंवा महिला प्रत्येकालच थकवा, कमकुवतपणा येणं अशी लक्षणं जाणवतात. (Baba Ramdev Shared a Calcium And Protine Rich Recipes That Increase Body Strength)
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराची ताकद कमी होते आणि थोडं काम केलं तरी लोकांना दम लागतो. हाडं देखील कमकुवत होतात. वेळीआधीच केस पांढरे होतात, कमकुवतपणा जाणवतो. महिलांमध्ये रक्ताची कमतरता असणं हे खूपच कॉमन आहे. ज्यामुळे इम्यून सिस्टिम कमकुवत होते आणि लोक संक्रमणाचे शिकार होतात. (Healthy Foods That Can Help You to Gain Weight)
तुम्हीसुद्धा शारीरिक समस्यांचा सामना करत असाल तर आहारात बदल करून तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. योग गुरू बाबा रामदेव यांनी काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहे ज्यामुळे तुमच्या शरीरात कमकुवतणा जाणवणार नाही आणि तब्येतही चांगली राहील.
योगगुरू बाबा रामदेव यांनी शरीराची कमजोरी कमकुवतपणा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. घरच्याघरी या उपायांचा अवलंब करू तुम्ही तब्येत चांगली ठेवू शकता. याच्या सेवनाने शरीराला पोषक तत्व मिळतात. या मिश्रणाचे नियमित सेवन केल्याने फक्त शरीरात ताकद येत नाही तर इम्यून सिस्टिमही चांगली राहते.
ताकद वाढवण्यासाठी काय खायला हवं?
10 ग्रॅम काकडीच्या बीया, १० ग्रॅम भोपळ्याच्या बीया, १० ग्रॅम टरबूजाच्या बिया, १० ग्रॅम अक्रोड, १० ग्राम आळशीच्या बीया, १० ग्रॅम काळी मिरी, १ ते २ ग्रॅम दालचिनी, १० ग्रॅम खडीसाखर. हे सर्व पदार्थ कुटून व्यवस्थित बारीक करा, त्यात १० ग्राम खडीसाखर घाला आणि पुन्हा कुटून घ्या. नंतर एका काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा. या मिक्षणाचे रोज १ चमचा सेवन केल्याने पोटाचे विकार उद्भवणार नाहीत.
नसांमध्ये कमकुवतपणा असेल या मिश्रणाचे रोज सेवन करा. ज्यामुळे संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह सुरळीत होईल. शरीराचे कामकाज चांगले राहील. शरीरात ही प्रकारच्या पदार्थांची कमतरता भासू नये यासाठी रोज याचे सेवन करा. इम्यून सिस्टिम कमकुवत होण्याचे कारण म्हणजे तुमच्या शरीरातील आजारांशी लढण्याची शक्ती कमी झाली आहे. ज्यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडते. इम्यून सिस्टिम मजबूत करण्यासाठी या मिश्रणाचे नेहमीच सेवन करायला हवे.
पोट सुटलंय, मांड्याची चरबी वाढलीये? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या, लटकलेलं पोट कमी होईल
रामदेव बाबा सांगतात की हे मिश्रण कमकुवतपणासाठी एक सुपरफूड आहे. जर तुम्ही थोडं काम केल्यानंतर लगेच थकत असाल किंवा कमकुवतपणा जाणवत असेल तर या मिश्रणाचे सेवन करायला हवे. यात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्नप्रमाणेच इतर पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीर दीर्घकाळ तरूण राहते.
बिया आणि पोषक तत्वांचे फायदे
या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड्स, फायबर्स, प्रोटीन्स, एंटीऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट, मॅग्नेशियम, जिंक, व्हिटामीन ई, आयर्न सेलेनियम आणि फायटोकेमिकल्स यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि हाडं मजबूत करण्यासाठी मदत होते.