Lokmat Sakhi >Fitness > कितीही खा वजन वाढतच नाही? प्रोटीन पावडरपेक्षा जास्त पॉवरफुल आहे हे 'घरगुती चुर्ण'; एका आठवड्यात दिसेल फरक

कितीही खा वजन वाढतच नाही? प्रोटीन पावडरपेक्षा जास्त पॉवरफुल आहे हे 'घरगुती चुर्ण'; एका आठवड्यात दिसेल फरक

How to Gain Weight Quickly & Safely : काहीजण भरपूर खातात तरी त्यांच्या अंगाला लागत नाही असं खूपदा होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 04:02 PM2024-01-15T16:02:47+5:302024-01-16T13:16:38+5:30

How to Gain Weight Quickly & Safely : काहीजण भरपूर खातात तरी त्यांच्या अंगाला लागत नाही असं खूपदा होतं

How to Gain Weight Quickly & Safely : According To Doctor Follow These Tips To Gain Weight Homemade Churn | कितीही खा वजन वाढतच नाही? प्रोटीन पावडरपेक्षा जास्त पॉवरफुल आहे हे 'घरगुती चुर्ण'; एका आठवड्यात दिसेल फरक

कितीही खा वजन वाढतच नाही? प्रोटीन पावडरपेक्षा जास्त पॉवरफुल आहे हे 'घरगुती चुर्ण'; एका आठवड्यात दिसेल फरक

'किती सुकडी आहे, हवा आली तरी उडून जाशील', 'अगं, तुला घरातले  काही खायला देतात की नाही.' असे टोमणे कमी वजन असलेल्यांना कायम ऐकावे लागतात. (How to gain Weight Easily) बाहेरचं खा किंवा घरातलं पौष्टीक खा काही अंगाला लागत नाही. काहीजणांचे वाढलेलं वजन कमी होता होत नाही तर काहींचे  कमी झालेले वजन वाढत नाही. (Healthy Ways to Gain Weight Suggested by Doctor)

वजन जास्त असेल तर तुम्ही डाएट व्यायाम करून मेंटेन ठेवू शकता पण काहीजण भरपूर खातात तरी त्यांच्या अंगाला लागत नाही असं खूपदा होतं. वजन वाढवण्यासठी काहीही खाल्लं तरी उपयोग होत नाही याशिवाय कपड्यांची फिटींगही व्यवस्थित बसत नाही. (How to Gain Weight Quickly & Safely) योग्य मार्गाने वजन वाढवण्याबाबत डॉक्टर काय सांगतात ते समजून घेऊ.

बालरोगतज्ज्ञज्ञ डॉक्टर दीपिका राणा यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून अशा पावडरबद्दल सांगितले आहे. ज्याच्या सेवनाने शरीरात ताकद वाढते आणि मसल्स स्ट्रेंथ वाढवण्याबरोबरच वजन वाढण्यासही मदत होते.  विशेष म्हणजे ही पावडर तुम्हाला दुकानात घ्यायला जावं लागणार नाही. घरच्याघरी तुम्ही ही पावडर बनवू शकता. ही पावडर तयार करण्यसााठी तुम्हाला अश्वगंधा, शतावरी, पांढरी म्यूसली,  आयुर्वेदीक जडी बूटी लागतील. (According To Doctor Follow These Tips To Gain Weight Homemade Churn)

वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं का सोडायचं? दिवसभरात 'एवढ्या' चपात्या खा, मेंटेन दिसाल

एका आठवड्यात वजन वाढण्यासाठी काय करावे? (Weight Gaining Tips)

जर तुमचे वजन खूपच कमी असेल तर हाडं कमकुवत होणं, अंगात रक्त कमी होणं, रक्ताची कमतरता, मासिक पाळी वेळेवर न येणं, हृदयाचे आजार अशा समस्या उद्भवू शकतात.  या समस्या टाळण्यासाठी ही पावडर तुम्हाला महिनाभर वापरावी लागेल पण याचा रिजल्ट काही दिवसातंच दिसून येईल. 

 

पावडर तयार करण्यााठी लागणारं साहित्य (Weight Gain Churna For Better Health)

१) अश्वगंधा- १०० ग्राम

२) शतावरी- १०० ग्राम

३) पांढरी मूसळी- १०० ग्राम

४) विदारी कंद- ५० ग्रॅम

५) खडीसाखर- २०० ग्रॅम

६) त्रिकटू चुर्ण -१०० ग्रॅम

वरील सर्व  पदार्थ मिक्स करून एक बारीक पावडर तयार करून घ्या आणि एका सुक्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. गरजेनुसार याचा वापर करा. (What Should I Eat For Weight Gain) डॉक्टर सांगतात की ही पावडर तुम्ही सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा घेऊ शकता.  या पावडरमध्ये कोमतेही केमिकल्स नसल्यामुळे साईड इफेक्ट्स जाणवणार नाहीत. 

केस वर काळे आतून पांढरे झाले? शहनाज सांगतात किचनमधल्या ३ वस्तू लावा; काळे-शायनी होतील केस

एक चमचाभर पावडर एक ग्लास दूधात मिसळून याचे सेवन करा. यामुळे शारीरिक कमकुवपणा दूर होईल वजनात वाढ दिसेल आणि आत्मविश्वासही वाढेल. याशिवाय रोज व्यायाम करण्याची सुरूवात ठेवा.  व्यायाम जमत नसेल तर सायकलिंग, वॉकिंग करून शरीर नेहमी एक्टिव्ह ठेवा. 

Web Title: How to Gain Weight Quickly & Safely : According To Doctor Follow These Tips To Gain Weight Homemade Churn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.