महिलांच्या फिगरबाबतीत बोलायचं झाल्यास ३४-२४-२६ अशीच मोजली जाते. कोणा अभिनेत्री किंवा एखाद्या महिलेची फिगर चांगली असेल तर, तिला ३४-२४-३६ मापाची फिगर आहे, अशी उपमा देण्यात येते. ज्यांची ३४-२४-३६ या मापाची फिगर असते, त्यांची फिगर आकर्षक मानली जाते. प्रत्येक स्त्रीचं हेच स्वप्न असतं की तिची फिगर ३४-२४-३६ या मापाची असावी. ज्याला कर्व्ही फिगर देखील म्हणतात.
परंतु, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना व्यायामासाठी वेळ मिळेलचं असे नाही. परंतु, तरी देखील आपण कामातून वेळ काढत ३४-२४-३६ या फिगरसाठी प्रयत्न करू शकता. ३४-२४-३६ ही फिगर हवी असेल तर, अॅनिटाईम फिटनेसचे इंटरनॅशनल फिटनेस एक्सपर्ट कोच अमिंदर सिंग यांनी सांगितलेल्या ५ व्यायामांना फॉलो करून पाहा(How To Get Perfect Figure 36 24 36 Hourglass).
ब्रिज पोझ
ब्रिज पोझ केल्याने पोटाची चरबी जलद गतीने कमी होते. शिवाय स्नायू मजबूत होतात. मांड्या देखील टोन्ड होतात. नियमित ब्रिज पोझ केल्याने पाठदुखीपासून तर आराम मिळतोच, शिवाय पेल्विक फ्लोर स्नायू घट्ट होण्यासही मदत होते. हे ब्लड सर्कुलेशन वाढवून नैराश्य आणि तणाव पातळी कमी करते.
साबुदाणा खाल्ल्याने वजन कमी होते की वाढते? साबुदाणा खाण्याची योग्य पद्धत कोणती?
वन लेग अप
वन लेग अप हा व्यायाम करण्यासाठी, पोटावर झोपल्यानंतर, हळू हळू आपले पाय मागच्या बाजूने वर करा. हा व्यायाम नियमित केल्याने पाठीच्या आणि नितंबांचे स्नायू चांगले टोन्ड होतील, शिवाय मजबूतही होतील.
रिज़िस्टन्स बँड विद सिटेड रो
खरंतर हा बँड स्ट्रेच केल्याने पाठीच्या स्नायूंना टोन अप होण्यास मदत होते. नियमित हा व्यायाम केल्याने अपर बॉडीवरील अतिरिक्त चरबी कमी होते.
वजन कमी करायचंय? मग नियमित ५ मिनिटं उड्या मारा, जंपिंग जॅक करण्याचे ४ फायदे पाहा
स्क्वॅट
जर आपल्याला किलर फिगर हवी असेल तर, दररोज स्क्वॅट हा व्यायाम करावा. यामुळे मांड्या टोन्ड होतील, शिवाय हिप्स किंवा ग्लूटचे स्नायू मजबूत होतील. यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात, व रक्ताभिसरणही सुधारते.
सुपरमॅन पोझ
सुपरमॅन पोझ हा व्यायाम, बॅक एक्स्टेंशन व्यायाम एब्स आणि बॅक स्नायूंना उत्तमरित्या टोन करते. हे पोझेस तुमचे पोट, हात, खांदे, पाठीचा खालचा भाग आणि पाय एकाच वेळी टोन करतात.