Lokmat Sakhi >Fitness > दिवसभर कम्प्यूटरवर काम, ऑफिसातून घरी आल्यावर डोकं दुखतं, गळाल्यासारखं होतं? ४ गोष्टी- वाटेल फ्रेश

दिवसभर कम्प्यूटरवर काम, ऑफिसातून घरी आल्यावर डोकं दुखतं, गळाल्यासारखं होतं? ४ गोष्टी- वाटेल फ्रेश

How To Get Relax After using Continuous Screen : दिवसात ८ ते १० तास कॉम्प्युटरवर काम केल्याने डोळ्यांना ताण येतो, त्यासाठी उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 04:38 PM2023-04-28T16:38:06+5:302023-04-28T17:41:51+5:30

How To Get Relax After using Continuous Screen : दिवसात ८ ते १० तास कॉम्प्युटरवर काम केल्याने डोळ्यांना ताण येतो, त्यासाठी उपाय...

How To Get Relax After using Continuous Screen :Sitting in front of the computer all day, headache, fatigue? Do 4 things, eyes will get relief, feel fresh | दिवसभर कम्प्यूटरवर काम, ऑफिसातून घरी आल्यावर डोकं दुखतं, गळाल्यासारखं होतं? ४ गोष्टी- वाटेल फ्रेश

दिवसभर कम्प्यूटरवर काम, ऑफिसातून घरी आल्यावर डोकं दुखतं, गळाल्यासारखं होतं? ४ गोष्टी- वाटेल फ्रेश

कॉम्प्युटरवर काम करणे ही आता प्रत्येकाची गरज झाली आहे. पूर्वी कॉम्प्युटर नव्हते तेव्हा कष्टाची कामे जास्त प्रमाणात होती. इतकेच नाही तर सगळ्या गोष्टी कागदावर लिहील्या जायच्या. पण ९० च्या दशकानंतर कॉम्प्युटर आले आणि जगभरात वेगाने प्रगती झाली. बहुतांश कामे ही कॉम्प्युटरवर होत असल्याने त्याशिवाय पर्याय राहीला नाही. आता अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळे जण बहुतांश प्रकारची कामे ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर करतात. ऑफीस वर्क करणाऱ्यांना तर त्याशिवाय पर्यायच नसतो. दिवसात ८ ते १० तास कॉम्प्युटरवर काम केल्याने अनेकदा डोकेदुखी, डोळ्यांना ताण येणे, शीण येणे अशा समस्या उद्भवतात (How To Get Relax After using Continuous Screen). 

म्हणूनच कॉम्प्युटरवर काम करताना मधे मधे ब्रेक घेणे गरजेचे असते. नाहीतर आपले शरीर, मन आणि मेंदू सगळेच खूप थकतात. यातही कॉम्प्युटर, मोबाइल आणि टीव्ही पाहून आपल्या डोळ्यांना आणि डोळ्याच्या आजुबाजूच्या नसांना जास्त ताण येतो. डोळ्यांना ताण आला की डोकेदुखी, डोळ्याच्या आजुबाजूच्या भागावर ताण येणे अशा समस्या उद्भवतात. प्रसिद्ध योग अभ्यासक शानी दयान यासाठीच काही सोपे उपाय शेअर करतात. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्या हे उपाय सांगतात. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे...

(Image : Google)
(Image : Google)

१. डोळे बंद करायचे आणि ते आकुंचन प्रसरण करायचे. यामुळे डोळ्यांच्या आजुबाजूच्या सगळ्या स्नायूंना ताण पडण्यास मदत होते आणि हे स्नायू रिलॅक्स व्हायलाही याची चांगली मदत होते. 

२. हात चेहऱ्यासमोर धरा आणि त्याचा अंगठा उघडून त्याकडे एकटक पाहण्याचा प्रयत्न करा. सतत स्क्रीनकडे पाहून आपले डोळे थकतात अशावेळी जवळच्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं उपयुक्त ठरतं. 


३. हाताच्या पहिल्या २ बोटांनी डोळ्यांच्या बाजूला मसाज करा. यामध्ये प्रामुख्याने भुवया आणि डोळ्यांच्या खालच्या बाजूने मसाज करायला हवा. त्यामुळे डोळ्यांवर आणि स्नायूंवर आलेला ताण निघून जाण्यास मदत होते.  

४. दोन्ही हात एकमेकांवर घासा आणि डोळे मिटून हातांची ऊब डोळ्यांवर घ्या. यामुळेही बरंच रिलॅक्स वाटण्यास मदत होईल. हा अतिशय सोपा आणि पारंपरिक उपाय असून तो करायचेही आपल्या लक्षात येत नाही. मात्र अगदी झटपट होणारे आणि करायला सोपे असलेले हे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.  


 

Web Title: How To Get Relax After using Continuous Screen :Sitting in front of the computer all day, headache, fatigue? Do 4 things, eyes will get relief, feel fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.