दुचाकी किंवा चारचाकी गाडी जास्त वेळ चालविल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे, झोपणे आणि चालणे, तासंतास एकाच जागी, एकाच अवस्थेत बसून काम करणे यामुळे बऱ्याच जणांना कमी वयातच पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे. हा त्रास कमी करण्यासाठी व्यायाम करणे खूप जास्त गरजेचे आहे. कारण त्यामुळेच तुमच्या दुखावणाऱ्या स्नायूंना आराम मिळू शकतो. पण व्यायाम करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर पाण्याच्या बाटल्या घेऊन हा एक अतिशय सोपा व्यायाम दररोज नियमितपणे घरच्याघरी करा (how to get relief from backpain, shoulder pain and neck pain?). यामुळे तुमचे आखडून गेलेले अंग मोकळे होऊन पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होईल.(best exercise to reduce backpain, shoulder pain and neck pain)
मान- पाठ- खांदे दुखत असतील तर कोणता व्यायाम करावा?
मान, पाठ, खांदे दुखणं कमी करण्यासाठी घरच्याघरी कोणता सोपा व्यायाम करता येईल, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ फिटनेस ट्रेनरने jamesmoorewellness या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
लग्न समारंभात गळ्यात हवंच ठसठशीत भरीव मंगळसूत्र- बघा मोठ्या मंगळसूत्रांचे ८ सुंदर डिझाईन्स
हा व्यायाम करण्यासाठी पाण्याने भरलेली एक लीटरची बाटली घ्या. यानंतर बाटली एका हाताने वर उचला तो हात कोपऱ्यातून दुमडा, दुसरा हात खालच्या बाजूने कोपऱ्यातून वाकवून पाठीमागे घ्या. आता वरच्या हातातून बाटली खालच्या हातात द्या. यानंतर ज्या हातात बाटली आहे तो हात पुन्हा वर करा, कोपऱ्यातून वाकवून पाठीमागे न्या. याचवेळी जो हात आधी वर होता तो आता खाली करून कोपऱ्यातून वाकून पाठीवर घ्या. पुन्हा वरच्या हातातून खालच्या हातात बाटली द्या. अशा पद्धतीने २० वेळा व्यायाम करा असे जवळपास ३ वेळा करावे.
हा व्यायामही करून पाहा
हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हातात पाण्याने भरलेल्या एकेक लीटरच्या बााटल्या घ्या. ताठ उभे राहा. तुमचे तळहात समोरच्या दिशेने हवे अशा पद्धतीने हात ठेवा.
डायबिटीस असणाऱ्यांनी दिवसाची सुरुवात इंस्टंट कॉफी पिऊन केली तर? डॉक्टरांचा 'हा' सल्ला वाचाच...
यानंतर दोन्ही हात कोपऱ्यातून वाकवून बाटल्या खांद्याला समांतर घ्या. यानंतर हात वर करा. पुन्हा हात खाली घेऊन अशीच क्रिया करावी. हा व्यायामही २० वेळा करावा. असे प्रत्येकी ३ वेळा करावे.