डॉ. अंबिका याडकीकर
हल्ली बऱ्याच जणांचं कामाचं स्वरूप बदललेलं आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना दिवसातले ८- १० तास सलग लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर काम करावं लागतं. बरेच शाळकरी विद्यार्थीही मानदुखीची तक्रार करत असतात. ज्यांना नेहमीच खूप जास्त प्रमाणात टु व्हीलर चालवावी लागते, त्यांनाही नेहमीच मानदुखीचा त्रास होतो (how to get relief from neck pain?). म्हणूनच मानेचे स्नायू रिलॅक्स करून मानदुखी चटकन कमी करण्यासाठी अगदी बसल्याबसल्या ५ ते ७ मिनिटांत तुम्ही हे काही व्यायाम नक्कीच करून बघू शकता..(best exercises for reducing neck pain quickly)
मानदुखी कमी करण्यासाठी व्यायाम
१. मानेची हालचाल
- मान दुखत असेल तर सगळ्यात आधी वर-खाली, डावीकडून-उजवीकडे अशा पद्धतीने मान प्रत्येकी ५- ५ वेळा फिरवा.
- त्यानंतर मान क्लॉकवाईज आणि अँटिक्लॉकवाईज दिशेने प्रत्येकी ३- ३ वेळा फिरवा.
सारखं डोकं दुखतं- काय करावं सुचत नाही? बघा सोपे व्यायाम, दुखणाऱ्या डोक्याला मिळेल आराम..
- यानंतर मान वर करून डाव्या बाजुला किंवा उजव्या बाजुला तिरक्या दिशेने बघा. त्यानंतर हळूहळू खाली घेऊन पुन्हा विरुद्ध बाजूला तिरक्या दिशेने वर बघा. अशा पद्धतीने मान दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ३- ३ वेळा फिरवा.
२. मानेवर दाब देणे
- मान दुखत असेल तर कपाळावर दोन्ही तळहात ठेवा आणि दाबल्यासारखे करा. म्हणजेच डोके मागे ढकलण्याचा प्रयत्न करा.
भगर- खिचडी नेहमीचीच! नवरात्रीच्या उपवासाला करा खमंग- खुसखुशीत पुऱ्या, घ्या सोपी रेसिपी
- त्यानंतर डोक्याच्या मागच्या बाजूला दोन्ही तळहात ठेवून दाब द्या. म्हणजेच डोके पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा.
- यानंतर एक हात कानाच्या वर ठेवून डोक्यावर दाब देण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीने दुसऱ्या हातानेही दाब द्या.
३. हा व्यायामही करून पहा
हा व्यायाम करण्यासाठी मानेखाली उशी घेऊन पाठीवर झोपा. त्यानंतर तुमचा चेहरा खाली ओढा आणि हनुवटी गळ्याच्या किंवा छातीच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा.
चेहऱ्यावर सारखे पिंपल्स येत असतील तर सगळ्यात आधी 'हे' काम करा, काही दिवसांतच पिंपल्स गायब...
हे व्यायाम केल्यामुळे मानेचे स्नायू ताणले जातात आणि मानदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते.