हवेत जराही बदल झाला तरी अनेक लोकांना तो अजिबात सहन होत नाही. थोडासा पाऊस पडला, थोडी थंड हवा सुटली किंवा कानाला- नाकाला काही न बांधता गाडीवर चक्कर मारून आलं तरी काही जणांना लगेच सर्दी होते. बरं ही सर्दी लवकर पिछाही सोडत नाही. नंतर कफ होतो, खोकला मागे लागतो. असं काही ना काही सतत सुरूच असतं. तुम्हालाही असा ॲलर्जिक सर्दीचा (How to get rid of allergic cold, cough?) त्रास वारंवार होत असेल तर ही एक सोपी योगमुद्रा शिकून घ्या. सर्दी, कफ असा त्रास लगेचच बरा होईल शिवाय वारंवार होणारही नाही. भ्रमर मुद्रा (Bhramar yog mudra) केल्याने सर्दी- खोकल्याचा त्रास कसा कमी होतो, याविषयीची माहिती इन्स्टाग्रामच्या theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आली आहे.(how to do bhramar mudra?)
कशी करायची भ्रमर मुद्रा?
१. ही मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम मांडी किंवा वज्रासन, पद्मासन घालून ताठ बसा.
२. आता दोन्ही हातांचे पहिले बोट म्हणजेच अनामिका दुमडून घ्या आणि तिचे सुरुवातीचे टोक अंगठ्याच्या खालच्या बाजूला लावा.
नारळीभात एकदम गचका, आसट होतो? ५ टिप्स, भात होईल मोकळा आणि मऊ...
३. यानंतर अंगठ्याचे वरचे टोक आणि मधल्या बोटाचे वरचे टोक एकमेकांना जाेडून घ्या आणि हलकासा दाब द्या.
४. आता अशी मुद्रा केलेले तळहात गुडघ्याला टेकवा आणि डोळे मिटून शांत बसा. १५ ते ४५ मिनिटे ही मुद्रा दररोज करावी.
५. सर्दी खोकल्याचा त्रास कमी होईल.
भ्रमर मुद्रा करण्याचे फायदे
१. कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीमुळे उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी भ्रमर मुद्रा करणे फायदेशीर ठरते.
लेक आजारी होती म्हणून..! सुश्मिता सेन सांगतेय, करिअर की मुलं आईला ठरवावंच लागतं कारण..
२. फ्लू, ताप, अंगात कणकण असणे, असे त्रासही भ्रमर मुद्रेमुळे कमी होतात.
३. टॉन्सिल्स, अंगावर रॅश येणे, पुरळ उठणे अशा त्रासांसाठी फायदेशीर.