Join us  

सकाळी पोट साफ व्हायला त्रास होतो? रोज ४ पदार्थ खा, गॅस, ॲसिडिटीपासून मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 2:06 PM

How to Get Rid of Constipation : बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रथम तुम्ही तुमच्या आहारातून मांस, चिप्स, मसालेदार आणि कडक पदार्थ यांसारखे बद्धकोष्ठता आणणारे पदार्थ काढून टाकावेत.

बद्धकोष्ठता ही सर्वात सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक आहे ज्याचा आजकाल अनेकांना त्रास होतो. बद्धकोष्ठता ही एक समस्या आहे ज्यामुळे आतड्याची हालचाल होण्यास त्रास होतो. (How to Get Rid of Constipation) सुरुवातीला, बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य वाटू शकते, परंतु उपचार न केल्यास ती एक गंभीर समस्या बनते आणि नंतर मूळव्याध, गुदाशयाच्या भागात वेदना आणि आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान रक्त येणं अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. (According to famous indian nutritionist include these 6 foods in your diet to relieve constipation)

बद्धकोष्ठतेवर उपचार काय आहेत?

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रथम तुम्ही तुमच्या आहारातून मांस, चिप्स, मसालेदार आणि कडक पदार्थ यांसारखे बद्धकोष्ठता आणणारे पदार्थ काढून टाकावेत. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही फायबर समृध्द पदार्थांचे सेवन वाढवावे. (6 foods in your diet to relieve constipation)

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आहारात अधिक फळे, भाज्या आणि नट्सचा समावेश करू शकता. या व्यतिरिक्त नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली सोबतच ताण कमी केल्यास देखील बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा (डायरेक्टर, फॅट टू स्लिम) यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की, बद्धकोष्ठतेच्या वेळी आराम मिळवण्यासाठी तुमची आहार योजना काय असावी. (Best Home Remedies For Immediate Relief From Constipation)

तुळशीच्या बिया आणि बदाम भिजवा

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एक चमचा भिजवलेल्या तुळशीच्या बियांनी करावी. त्यानंतर, 5 बदाम, 1 अक्रोड आणि 3 काळे मनुके घ्या, ते देखील रात्रभर भिजवून ठेवा.

गॅसेसवर उपाय

सुकं अंजीर

स्नॅक म्हणून तुम्ही अंजीर आणि खजूर स्मूदी घेऊ शकता. या स्मूदीसाठी, तुम्हाला 2 अंजीर, 2 खजूर, 1/4 कप ओट्स, 3/4 कप दूध, एक चिमूटभर दालचिनी, एक चिमूटभर जायफळ आणि 1 टीस्पून चिया बिया एकत्र कराव्या लागतील.

पपई

रात्री 11 वाजता जेवणापूर्वी एक वाटी पपई खा. दुपारच्या जेवणाच्या ३० मिनिटे आधी एक ग्लास ताक आणि १/२ टीस्पून फ्लेक्ससीड घ्या.

गॅसेसवर घरगुती उपाय मूग डाळ

दुपारच्या जेवणात तुम्ही नाचणीची भाकरी, तूप, हिरवी मूग डाळ दुपारी १ वाजता खाऊ शकता. संध्याकाळी ५ च्या सुमारास तुम्ही काकडी, गाजर, बीटरूट लाडू सोबत हंग कर्ड डिप खाऊ शकता. हंग कर्ड डिप बनवण्यासाठी तुम्हाला हँग कर्ड , 2 काकड्या, 1 मिरची, 1/2 किसलेले बीटरूट, 4 लसूण पाकळ्या आणि हिरवी धणे आवश्यक आहे.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य