उत्तम आरोग्य राखण्यासाठी योगशास्त्रात जसे वेगवेगळे व्यायाम, प्राणायाम (yoga and pranayam) सांगितले आहेत, तशाच काही योगमुद्राही सांगितल्या आहेत. या योगमुद्रांचा (yog mudra) उपयोग करून निश्चितच अनेक आजारांना दूर ठेवता येतं. असं म्हणतात की आपल्या तळहातात असे अनेक पॉईंट्स किंवा चक्र असतात, जे आपल्या शरीराच्या अनेक क्रिया नियंत्रित करतात. या पॉईंट्सवर विशिष्ट पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात दाब देण्याची क्रिया आपण योग मुद्रांच्या माध्यमातून करत असतो. या लेखात आपण मकर मुद्रा (makar mudra for mental and physical health) या योग मुद्रेविषयी माहिती घेणार आहोत. डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे कमी करून सौंदर्य वाढविणे हा तर या मुद्रेचा एक फायदा आहेच, पण त्यासोबतच इतर अनेक आरोग्यदायी लाभही मकर मुद्रा केल्याने मिळतात. (Benefits of makar mudra)
कशी करायची मकर मुद्रा?
- मकर मुद्रा करण्यासाठी तुमचा डावा तळहात तुमच्या समोर ठेवा. पहिली ३ बोटे एका बाजूला आणि करंगळी त्यांच्यापासून वेगळी थोड्या अंतरावर अशा पद्धतीने बोटांची रचना करा.
- आता उजवा तळहात डाव्या तळहाताच्या खाली ठेवा. डाव्या हाताच्या करंगळी आणि त्याच्या बाजूची बोटे यांच्यामध्ये जे अंतर आहे त्या गॅपमधून उजव्या हाताचा अंगठा वर घ्या आणि त्या अंगठ्याने डाव्या तळहातावर मध्यभागी जोर द्या.
- आता उजव्या हाताचा अंगठा डाव्या तळहातावर मध्यभागी आणि बाकीची बोटे डाव्या तळहाताच्या खाली अशा पद्धतीने तुमच्या हाताची रचना असेल.
- यानंतर डाव्या हाताचा अंगठा आणि मरंगळी ही बोटे एकमेकांवर ठेवा. आता हाताची जी अवस्था असेल तिला मकर मुद्रा म्हणतात.
किती वेळ करायची मकरमुद्रा?
- मकर मुद्रा ही सुरुवातीला १० ते १५ मिनिटे करावी. त्यानंतर वेळ वाढवत नेऊन ती जवळपास ३० ते ४० मिनिटेही करता येते.
- मकर मुद्रा करण्यासाठी पद्मासन, वज्रासन घालून ताठ बसावे. मांडी घालून बसले तरी चालते.
- जमिनीवर आसन करून किंवा मांडी घालून बसणे शक्य नसेल तर खुर्चीवर ताठ बसूनही ही मुद्रा करता येते.
मकरमुद्रा करण्याचे फायदे
१. डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी होतात आणि एकंदरीतच सगळ्या चेहऱ्यावर ग्लो दिसायला लागतो.
२. शरीरात अधिक काळ उर्जा टिकवून राहण्यास मदत होते.
३. दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी उत्तम मुद्रा.
४. किडनी निरोगी ठेवण्यासाठी ही मुद्रा अतिशय फायदेशीर मानली जाते.
५. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवर्जून ही मुद्रा करावी.
६. निगेटीव्हिटी, तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त.
७. मुड स्विंगचा त्रास असणाऱ्यांसाठी, डिप्रेशन कमी करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी उपयुक्त.