मागचा भाग म्हणजेच पार्श्वभाग (Hips) यावर जास्त चरबी जमा झाली तर संपूर्ण शरीर बेढब दिसू लागतं. वाढत्या वयात महिलांच्या हिप्सवर फॅट्स जमा होत जातात. पोस्ट प्रेग्नंसीत किंवा सतत बसून राहील्यानं कुल्ह्यांवर चरबी जमा होते. व्यवस्थित आकार नसल्यानं संपूर्ण शरीर बेढब दिसतं.(Best Exercises to Tone Your Hips diet tips to reduce hips fat) अन्हेल्दी पदार्थ खाणं, हॉर्मोनल इम्बेलेंस, अनुवांशिक कारणांमुळे हे फॅट जमा होतं. काही सोपे उपाय हे फॅट कमी करण्यास आणि परफेफ्ट शेप देण्यात फायदेशीर ठरू शकतात. (Ways to reduce hips fat)
कार्डिओ व्यायाम गरजेचे
शरीरातील चरबी खासकरून मागच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही दिवसभर बसण्याची सवय टाळायला हवी. रोज न चुकता व्यायाम करा. कार्डिओ व्यायाम प्रकारांबरोबरच स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम केल्यानं ही चरबी कमी होण्यास मदत होईल. फिटनस ट्रेनरचा सल्ला घेऊन तुम्ही घरीच व्यायाम सुरू करू शकता.
एरोबिक्स व्यायाम
एरोबिक्स व्यायामानं तुम्ही शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी करू शकता. एरोबिक्स व्यायाम खासकरून कमरेच्या आसपास जमा झालेलं फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. या व्यायामानं एस्क्ट्रा फॅट कमी होऊन ग्लूट्स टोन होतात. एरोबिक्स व्यायामानं तुमच्या मांड्यांवरची चरबी कमी होते यासाठी सायकलिंग करा आणि रोज चालायला जा.
नारळाच्या तेलानं मसाज करा
नारळाच्या तेलानं मसाज केल्यास कुल्हे, कंबर आणि मांड्यांच्या आसपासची चरबी कमी होते. मेटाबॉलिझ्म वाढतो. यामुळे फॅट्स उर्जेत बदलतात. मृतपेशी निघून जाण्यास मदत होते.त्वचेलाही पोषण मिळतं.
जास्तीत जास्त पाणी प्या
पाणी प्यायल्यानं शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. पाण्यामुळे लिव्हरमधील फॅट्स एनर्जीमध्ये बदलतात. यामुळे मेटाबॉलिझम वेगानं वाढतो. पाणी प्यायल्यानंतर बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि यामुळे वजन वाढणं कमी होऊ शकतं.
बाहेरचं खाणं बंद करा
जर तुम्ही बाहेरचं खात असाल तर आजच ही सवय बंद करा. जर तुम्ही ओव्हर ऑल वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर घरी बनवलेले पदार्थच खा. डाएटमध्ये लो कार्बोहायड्रेट्स खाद्यपदार्थांचा समावेश करा, लो कॅलरीज फूड्सचे सेवन करा.