Lokmat Sakhi >Fitness > तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात? 'या' पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत 

तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात? 'या' पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत 

How To Get Rid Of Knee Pain: तरुणपणीच गुडघे दुखायला लागले असतील तर तो त्रास टाळण्यासाठी या पद्धतीने थोडा चालण्याचा व्यायाम करून पाहा..(Anshuka Parwani suggests exercise for reducing knee pain)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 13:09 IST2025-03-24T13:07:16+5:302025-03-24T13:09:03+5:30

How To Get Rid Of Knee Pain: तरुणपणीच गुडघे दुखायला लागले असतील तर तो त्रास टाळण्यासाठी या पद्धतीने थोडा चालण्याचा व्यायाम करून पाहा..(Anshuka Parwani suggests exercise for reducing knee pain)

how to get rid of knee pain, walking exercise to stop knee pain, anshuka parwani suggests exercise for reducing knee pain | तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात? 'या' पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत 

तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात? 'या' पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत 

Highlightsउलट्या पद्धतीने चालल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास तर कमी होतोच, पण त्यासोबतच इतरही काही फायदे होतात.

हल्ली वयाचा आणि गुडघेदुखीचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण पुर्वी साधारण वयाची पन्नाशी, साठी ओलांडली की मग गुडघे कुरकुरायला सुरुवात व्हायची. पण आता मात्र लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कमी वयातच तरुण मंडळींचे गुडघे दुखायला सुरुवात झाली आहे. जमिनीवर मांडी घालून बसण्याचा, उठण्याचा बहुतांश लोकांना प्रचंड कंटाळा येतो कारण बसता, उठता गुडघे दुखतात (how to get rid of knee pain?). हा त्रास टाळण्यासाठी आहारावरही थोडा भर दिला पाहिजे आणि व्यायामाकडेही जरा लक्ष दिलं पाहिजे. याबाबतच सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी खास माहिती दिली आहे.(Anshuka Parwani suggests exercise for reducing knee pain)


गुडघेदुखी कमी करण्यासाठी व्यायाम

गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा,याविषयीची माहिती आलिया भट, करिना कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी साेशल मीडियावर शेअर केली आहे.

८ दिवसांत कळ्यांनी, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल गुलाबाचं रोप, ३ खतं घाला- बघा कमाल

यामध्ये त्या सांगतात की गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी दिवसातून १० ते १५ मिनिटे दररोज नियमितपणे थोडे उलटे चालावे. म्हणजेच पुढे जाण्याच्या ऐवजी मागे जावे. अशा पद्धतीने चालल्यामुळे गुडघ्यांवर योग्य तो दाब येऊन त्यांचा व्यायाम होतो. याशिवाय गुडघ्यांशी जोडलेले असणारे पोटऱ्यांचे स्नायू तसेच मांडीचे स्नायू यांचाही व्यायाम होतो आणि गुडघेदुखीचा त्रास खूप कमी होतो.

 

उलटे चालल्यामुळे होणारे इतर फायदे

उलट्या पद्धतीने चालल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास तर कमी होतोच, पण त्यासोबतच इतरही काही फायदे होतात. ते नेेमके कोणते ते पाहुया..

World TB Day : साधा खोकला समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात, टीबीची लक्षणं वेळीच ओळखा

१. पहिला फायदा म्हणजे पायाच्या घोट्यांचाही योग्य व्यायाम होतो आणि ज्यांचे घोटे दुखतात, तो त्रासही कमी होण्यास मदत होते.

२. मेंदूचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते. आपला मेंदू आणखी ॲक्टीव्ह होतो..

३. दोन्ही पाय तसेच मेंदूमधला समन्वय वाढण्यास आणि त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

४. शरीराचा योग्य तो समतोल साधण्याची आपली क्षमता वाढू लागते. 


 

Web Title: how to get rid of knee pain, walking exercise to stop knee pain, anshuka parwani suggests exercise for reducing knee pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.