Lokmat Sakhi >Fitness > उठून उभं राहिल्यानंतर टाचा खूप दुखतात- चालतानाही त्रास होतो? ५ उपाय- टाचांचं दुखणं थांबेल

उठून उभं राहिल्यानंतर टाचा खूप दुखतात- चालतानाही त्रास होतो? ५ उपाय- टाचांचं दुखणं थांबेल

Fitness Tips For Heel Pain: बऱ्याच महिलांना टाचदुखीचा त्रास जाणवतो. साधारण वयाच्या पस्तिशीनंतर बऱ्याच जणींना हा त्रास सुरू झालेला दिसतो. बघा हा त्रास कमी करण्याचे उपाय..(how to get rid of pain in heel?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 09:13 AM2024-10-09T09:13:33+5:302024-10-09T09:15:01+5:30

Fitness Tips For Heel Pain: बऱ्याच महिलांना टाचदुखीचा त्रास जाणवतो. साधारण वयाच्या पस्तिशीनंतर बऱ्याच जणींना हा त्रास सुरू झालेला दिसतो. बघा हा त्रास कमी करण्याचे उपाय..(how to get rid of pain in heel?)

how to get rid of pain in heel, how to get relief from heel pain | उठून उभं राहिल्यानंतर टाचा खूप दुखतात- चालतानाही त्रास होतो? ५ उपाय- टाचांचं दुखणं थांबेल

उठून उभं राहिल्यानंतर टाचा खूप दुखतात- चालतानाही त्रास होतो? ५ उपाय- टाचांचं दुखणं थांबेल

Highlightsटाचदुखीचा त्रास कमी करण्यासाठी काही साधे सोपे व्यायाम नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.

डॉ. अंबिका याडकीकर

साधारण वय वर्षे पस्तिशीच्या पुढच्या महिला पाहिल्या की त्या बहुतांश महिलांना टाचदुखीचा त्रास होतो, असं दिसून येतं. एका जागी बराच वेळ बसून जेव्हा आपण चालण्यासाठी उभं राहतो आणि एखादं पाऊल पुढे टाकतो, तेव्हा टाचेतून अक्षरश: कळ आल्यासारखं होतं. दोन- चार पावलं अडखळतच चालावी लागतात आणि नंतर मग कुठे व्यवस्थित चालता येतं. टाचदुखीचा त्रास कमी करण्यासाठी काही साधे सोपे व्यायाम नक्कीच उपयुक्त ठरू शकतात (how to get relief from heel pain?). त्याशिवाय इतर काही गोष्टीही करणं गरजेचं आहे. त्या नेमक्या कोणत्या आणि व्यायाम कोणते ते पाहूया...(how to get rid of pain in heel?)

 

टाच खूप दुखत असल्यास उपाय

१. टाचा खूप दुखत असतील तर आपण कोणत्या प्रकारच्या चपला वापरतो आहोत हे एकदा तपासून घेणं गरजेचं आहे. पायासाठी आरामदायक ठरणाऱ्या चपलांपेक्षा तुम्ही फॅन्सी चपलांना प्राधान्य देत असाल तर तुमची टाच दुखणारच. त्यामुळे बाहेर घालण्यासाठी आणि घरात घालण्यासाठीही शोभेच्या चपला निवडण्याऐवजी आरामदायी चपला निवडा. 

जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक

२. टाचा दूखत असतील तर हा एक व्यायाम करून पाहा. जमिनीवर टॉवेल अंथरा आणि पायाच्या बोटांनी तो पकडा आणि सोडा असं ५ ते ६ वेळा करा.

 

३. तळपाय आवळून घ्या आणि पुन्हा मोकळा करा. पायाची बोटं एकमेकांपासून दूर करा आणि पुन्हा जवळ आवळून घ्या. असं साधारण ४ ते ५ वेळा करा. 

पाहा संत्री- मोसंबीच्या सालींचे तुम्ही विचारही केला नसेल एवढे भन्नाट उपयोग, ६ खास टिप्स...

४. गोट्या किंवा छोटे दगड अशा वस्तू पायाच्या बोटांनी उचलायच्या आणि दुसऱ्या जागी ठेवायच्या. असं ४ ते ५ वेळा करावं. हे करत असताना टाच जमिनीवरच टेकवून ठेवावी. ती उचलू नये.

५. टाचा उचलून पायाच्या बोटांवर जोर देऊन १० ते १५ सेकंद उभे रहा. त्यानंतर पाय रिलॅक्स करा आणि पुन्हा तसेच करा. असे ४ ते ५ वेळा करावे.
 

Web Title: how to get rid of pain in heel, how to get relief from heel pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.