Join us  

How To Grow Calcium in Body : कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत ५ पदार्थ, नियमित खा म्हातारपणातही हाडं राहतील चांगली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 1:15 PM

How To Grow Calcium in Body : बालपण, पौगंडावस्थेत आणि प्रौढावस्थेत आपल्या हाडांमध्ये खनिजे जोडली जातात. पण वयाच्या तिशीनंतर ही प्रक्रिया मंदावते.

हाडं निरोगी ठेवण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आवश्यक आहे आणि कॅल्शियम शोषण्यासाठी तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डीची गरज असते. खराब हाडांच्या आरोग्यामुळे आर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे दीर्घकाळात हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अशा स्थितीत हाडं मजबूत करणं खूप गरजेचे असते. (Studies suggest these 5 drinks are rich in calcium helps to make bones strong and prevent joint pain)

बालपण, पौगंडावस्थेत आणि प्रौढावस्थेत आपल्या हाडांमध्ये खनिजे जोडली जातात. पण वयाच्या तिशीनंतर ही प्रक्रिया मंदावते. जर या काळात पुरेशी हाडांची वाढ तयार झाली नाही किंवा हाडांची झीज झाली, तर नाजूक हाडे विकसित होण्याचा धोका वाढतो. अनेक पोषण आणि जीवनशैलीच्या सवयी तुम्हाला मजबूत हाडे तयार करण्यात आणि वयानुसार त्यांची देखभाल करण्यात मदत करू शकतात. (Tips to keep your bones healthy)

कमजोर हाडांमुळे उद्भवणारे आजार

- हाडांचा कर्करोग

- हाडांची कमी घनता

- हाडांचा आजारांचा संसर्ग

- ऑस्टियोजेनेसिस   इम्परफॅक्टा

- ऑस्टिओपोरोसिस

फोर्टिफाईड किंवा दुधाला पर्यायी पदार्थांचा आहारात समावेश करा

आपल्या हाडांना आवश्यक पोषक द्रव्ये पोहोचवण्यासाठी दूध हे एक उत्तम पेय आहे. सीडीसीच्या मते, फोर्टिफाइड दूध आणि दुधाच्या पर्यायांमध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि प्रथिने असतात जे हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

पावसाळ्यात घरात गोम, गांडूळांनी धुमाकूळ घातलाय? ४ उपाय, किटक घरापासून लांब राहतील

फोर्टिफाइड दूध हे गाईचे दूध आहे ज्यामध्ये अतिरिक्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी नैसर्गिकरित्या सामान्य दुधात लक्षणीय प्रमाणात आढळत नाहीत. जर तुम्हाला लॅक्टोजची ऍलर्जी असेल किंवा गाईचे दूध आवडत नसेल, तर तुम्ही सोया, ओट, तांदूळ, नारळ, काजू आणि बदाम यांसारखे इतर वनस्पती-आधारित दूध पर्याय वापरून पाहू शकता.

हिरव्या भाज्या

आपण दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकत नसल्यास, कॅल्शियम मिळविण्याचे इतर मार्ग आहेत. पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या कॅल्शियमचा चांगला स्रोत आहेत. पालक ही पोषक घटकांसाठी चांगली पालेभाजी आहे. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सलेट असते.

 शरीरातलं घातक कोलेस्टेरॉल घटवण्यासाठी रोजच्या जेवणात हे पदार्थ खा, तब्येत राहील उत्तम

निरोगी हाडांसाठी स्मूदी

जर तुम्हाला दूध पिणे आवडत नसेल तर ते इतर मार्गांनी तुमच्या आहारात समाविष्ट करा. स्मूदीजमध्ये काही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ जोडणे हा हाडे निरोगी राहण्यास मदत करण्याचा एक चांगला मार्ग आहे. कमी चरबीयुक्त दूध, दही आणि अगदी फोर्टिफाइड सोया दूध हे सर्व कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने यांचे उत्तम स्रोत आहेत. हे पदार्थ सर्व मजबूत हाडे विकसित करण्यासाठी उत्तम आहेत.

फळं, ड्रायफ्रुट्स खा

फळे पचनक्रिया संतुलित ठेवण्याचे काम करतात. पीएच पातळी नियंत्रणात ठेवतात.  ज्यामुळे कॅल्शियमची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी विशेषतः उपयुक्त असलेले एक फळ म्हणजे प्रून. पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या इंटिग्रेटिव्ह अँड बायोमेडिकल फिजिओलॉजी प्रोग्राम आणि न्यूट्रिशन सायन्सेस अँण्ड किनेसियोलॉजी विभाग यांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, दररोज सुमारे 6 ते 12 बदाम किंवा इतर  ड्रायफ्रुट्स खाणं तब्येतीसाठी फायद्याचे ठरते. 

 

 रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांमध्ये हाडांच्या नुकसानास कारणीभूत दाहकता समस्या कमी करण्यास मदत होते.. त्याऐवजी तुम्ही संत्र्याचा रस देखील पिऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असते.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्य