ब्रेस्ट साइज (Breast Size) हा अनेक महिलांसाठी कॉम्प्लेक्सचा विषय असतो. कारण त्यांना तसे सांगितले जाते की भरदार स्तन म्हणजेच सौंदर्य. म्हणजेच फिगर उत्तम. खरंतर त्याचा संबंध आपले जिन्स, वयात येताना होणारी वाढ, शरीराची ठेवण यासाऱ्याशी असतो. मात्र चुकीच्या कल्पनांमुळे अनेक तरुणी आपला आत्मविश्वास गमावून बसतात. पॅडेड ब्रा वापरुन स्किन इन्फेक्शनही ओढावून घेतात. हा विषय असा की अनेक महिला आपल्या ब्रेस्ट साईजनं खुश नसतात. मोठी ब्रेस्ट असलेल्या महिला ब्रेस्ट कमी करण्याचा प्रयत्न करतात तर लहान ब्रेस्ट असलेल्या महिला ब्रेस्ट साईज वाढवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यापेक्षाही उत्तम तब्येत, सुडौल, योग्य आकारात असलेल्या, न ओघळलेल्या स्तनांसाठी काही व्यायाम करता येतात. ते करणं योग्य. मात्र गैरसमजातून स्वत:वर प्रयोग करु नयेत.
ब्रेस्ट साईज वाढण्यासाठी काहीजणी तेल, जेल, क्रिमचा वापर करतात किंवा कॉस्मेटीक सर्जरी करतात. बऱ्याचश्या ट्रिटमेंट्स या महागड्या असतात किंवा याचे साईड इफेक्ट्सही असतात. स्तनांचा आकार नैसर्गिकरित्या योग्य ठेवणे आणि फिटनेससाठी काही योगमुद्रा आणि योगासनं, व्यायाम, उत्तम आहार हे सारं उपयोगी ठरु शकतं. (How to improve breast size)
केस धुताना शॅम्पूमध्ये मिसळा 'हा' पदार्थ; केस कायम राहतील दाट, वाढ होईल चांगली
फिटनेस ट्रेनर जूही कपूर (Juhi Kapoor) यासंदर्भात सांगतात, ' ब्रेस्टचा आकार वाढवणाऱ्या योगा प्रकाराबाबत महिला जाणून घेऊ इच्छितात पण ब्रेस्टचा आकार जेनिटीक कारणांमुळे वाढतो किंवा कमी होतो. जे आपल्या नियंत्रणात नाही. ब्रेस्ट साईज वाढवण्यापेक्षा आहे तो आकार मेंटेन ठेवून योग्य शेपमध्ये आणा. या योगमुद्रांना आपल्या फिटनेस रूटीनमध्ये समाविष्ट करा. सुरभी मुद्रा आणि पृथ्वी मुद्रा तुम्ही करू शकता. (How to Increase Breast Size Naturally By Doing Yoga)
१) सुरभी मुद्रा
पाठ सरळ ठेवून बसा. उजव्या हाताच्या करंगळीच्या टोकानं डाव्या हाताच्या अनामिकेच्या टोकाला स्पर्श करा. नंतर डाव्या हाताच्या करंगळीच्या टोकानं उजव्या हाताच्या अनामिकेच्या टोकाला स्पर्श करा. उजव्या हाताच्या तर्जनीनं डाव्या हाताच्या अंगठ्याच्या टोकाला स्पर्श करा. नंतर उजव्या हाताच्या मोठ्या बोटाच्या टोकाने डाव्या हाताच्या तर्जनीच्या टोकाला स्पर्श करा. दोन्ही हातांचे अंगठे लांब ठेवा.
२) पृथ्वी मुद्रा
पाठ सरळ करून दोन्ही पाय दुमडून कमळाच्या मुद्रेत बसा. हात गुडघ्यावर ठेवा. नंतर अंगठ्याच्या टोकाने अनामिकेच्या टोकाला स्पर्श करा. अनामिका आतून दुमडून अंगठ्याच्या टोकाला स्पर्श करा. काही वेळ या स्थितीत राहा मग आराम करा. या मुद्रेनं चेहऱ्यावर ग्लो येतो, हाडं आणि मांसपेशी मजबूत होतात याशिवाय टिश्यूची ग्रोथ होण्यास मदत होते.
मसल्स गेनसाठी प्रोटीन इन्टेक वाढवणं खूप गरजेचं आहे. प्रोटीन संपूर्ण आरोग्यासाठी गरजेचे असते. खासकरून मांसपेशींचा विकास करण्यासाठी प्रोटीन सहाय्यक ठरते. प्रोटीन्स इन्टेक वाढल्यानं स्तन मसल्स वाढतात आणि ब्रेस्ट साईज वाढण्यास मदत होते. रोज नियमित प्रोटीन्सचे सेवन केल्यानं स्नायूंची ताकद आणि आकार दोन्ही वाढते.