आपल्याच वयाच्या किंवा आपल्यापेक्षाही मोठ्या वयाच्या बॉलीवूड अभिनेत्रींना किंवा आपल्या काही मैत्रिणींना आपण बघत असतो. असं सपासप त्यांचं अंग वाकतं (flexible body) आणि इतक्या नजाकतीने त्या काही योगासनं (yoga) किंवा काही व्यायाम करतात की ते पाहून आपणच आश्चर्यचकित होऊन जातो. आपल्याच वयाच्या या सगळ्या मैत्रिणींकडे इतकी लवचिकता आहे, पण मग आपलंच अंग का आखडून गेलंय, असा प्रश्न त्यामुळे अनेक जणींना पडतो. म्हणूनच शरीराची लवचिकता पुन्हा मिळविण्यासाठी किंवा मग आहे ती लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी (How to get flexible body?) हे काही सोपे उपाय करून बघा. यामुळे शरीर तर लवचिक होईलच पण स्नायूंची ताकद वाढण्यासही मदत होईल. हा उपाय इन्स्टाग्रामच्या theyogainstituteofficial या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आला आहे.
शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी...
१. प्राणायाम करणे विसरू नका (meditation)
खूप जणांच्या रेग्युलर वर्कआऊटमध्ये प्राणायामचा सहभाग नसतो. वॉकींग, स्ट्रेचिंग, सायकलिंग असा व्यायाम करून अनेकांचं वर्कआऊट सेशन संपून जातं. पण शरीराची लवचिकता वाढवायची असेल तर काही प्राणायाम करण्यावर नक्कीच भर दिला पाहिजे. प्राणायाम केल्यानेही मांसपेशींची ताकद वाढत जाते आणि त्यामुळे शरीर अधिकाधिक लवचिक होण्यास मदत होते. यासाठी प्रामुख्याने कपालभाती, कपालरंध्र धौती, कर्णरंध्र धौती असे प्रकार नियमितपणे करावे.
२. श्वासावर लक्ष केंद्रित करा (deep breathing)
योगा किंवा व्यायाम झाल्यानंतर आपण काहीवेळ डिप ब्रिथिंग म्हणजेच दिर्घश्वसन करतो. पण ते तेवढ्यापुरतं करतो आणि मग सगळा दिवस विसरून जातो. पण ही क्रिया दिवसभर चालू असावी, असं योग अभ्यासकांचं मत आहे. दिवसभरात अधूनमधून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. अतिशय शांत पद्धतीने अधिकाधिक दिर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. तेवढ्याच शांतपणे श्वास सोडा. काही दिवसांत आपोआपच शरीराला दिर्घ श्वसन करण्याची सवय लागून जाते. यामुळेही फ्लेक्झिबिलीटी वाढण्यास मदत होते.
३. ताठ बसा (body posture)
दिवसभरात असे क्षण अनेकदा येतात जेव्हा आपण एकदम डल पडतो आणि मग वाकून बसतो. अनेक जण काम करतानाही वाकून बसतात. पण शरीराची लवचिकता वाढवायची असेल तर वाकून बसण्याची सवय सोडून द्या. दिवसभर पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे तुमचे बॉडी पोश्चर तर सुधारेलच पण बाॅडी फ्लेक्झिबिलीटी वाढविण्यासाठीही उपयोग होईल.
४. दर २ तासांनी स्ट्रेचिंग (stretching)
हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला अवघ्या ५ ते १० सेकंदांचा वेळ लागणार आहे. यासाठी दर २ तासांनी उठा. आहे त्या ठिकाणी उभे राहून हात वर करा आणि एकमेकांमध्ये गुंफून घ्या. एकदा उजव्या बाजूला तर एकदा डाव्या बाजूला कंबरेतून वाका. दोन्ही बाजूंनी ४ ते ५ वेळा वाकले की झाले तुमचे स्ट्रेचिंग. उभं राहणं शक्य नसेल तर खुर्चीवर बसल्याबसल्याही अशा पद्धतीने तुम्ही व्यायाम करू शकता.
५. मनही फ्लेक्झिबल ठेवा (flexible mind)
शरीराने लवचिक व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाच्या, विचारांच्या कक्षाही रुंदावल्या पाहिजेत. वागण्यातल्या या बदलाचा खुप सकारात्मक परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतो. नेहमी फ्रेश, आनंदी रहा आणि कायम नवं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा.