आपलं वय कधीच वाढू नये असं आपल्याला वाटतं. आपण कायम तरुण दिसावं अशीच आपली इच्छा असते. त्यामुळे वय वाढलं तरी ते आपल्या चेहऱ्यावर दिसू नये असं आपल्याला वाटतं. मात्र वय वाढतं तशी त्याची चिन्ह चेहऱ्यावर दिसायला लागतात. पण हे वाढ़लेलं वय दिसू नये म्हणून नियमितपणे काही गोष्टी करणे आवश्यक असते. आपल्या दैनंदिन सवयींमध्ये थोडे बदल केल्यास त्याचा आपलं वय कमी दिसण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. चुकीच्या सवयी हे वय जास्त दिसण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे वय कमी दिसण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायचं ते पाहूया (How To Look Young Than Your Age)...
१. आहार
चांगला पोषक आहार घेणे हे आपण दिर्घकाळ तरुण दिसावे यासाठी महत्त्वाचे असते. यासाठी आपल्या आहारामध्ये प्रोटीन, गुड फॅट, विविध रंगाचे फायबर असलेले पदार्थ यांचा समावेश असणे गरजेचे असते. आहार उत्तम असेल तर नकळतच त्याचा आपल्या शरीरावर चांगला परीणाम होतो आणि आपण तरुण दिसण्यास त्याची मदत होते.
२. व्यायाम
व्यायामामुळे आपल्या शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते. तसेच व्यायामाने स्नायुंना बळ येते आणि आपण तरुण दिसण्यास त्याचा फायदा होतो.
३. झोप
आपल्याला ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. ही झोप नियमितपणे चांगल्यारितीने मिळाली तर आपण फ्रेश राहतो आणि फ्रेश दिसतो. पण झोप नीट झाली नाही तर मात्र आपण आळसावलेले दिसतो.
४. ताण
आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध प्रकारचे ताण असतात. मात्र या ताणाचा परीणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. म्हणूनच तुम्हाला तरुण दिसायचं तर मेडीटेशन, रोजच्या कामातून ब्रेक घेणे असे काही ना काही करुन तुमचा ताण कमी करावा लागेल.