काही जणांचे हात, पाय- मांड्या किंवा पोटाचा भागही फार काही सुटलेला नसतो. पण कंबरेवरची चरबी मात्र वाढायला लागते. कंबरेवरची चरबी वाढायला लागली की खरंतर आपण सतर्क होण्याची गरज आहे. कारण आपण वेट गेन करत आहोत किंवा आपलं वजन वाढायला लागलं आहे, याचं हे पहिलं सिग्नल असतं. तुमच्याही कंबरेवर चरबीचे टायर चढायला सुरुवात झाली असेल तर हे काही व्यायाम अगदी आतापासून सुरू करा (How to lose belly fat?). यामुळे कंबरेवरची चरबी तर कमी होईलच पण हात- पाय यांची हालचाल होऊन शरीराची लवचिकताही वाढेल. (3 exercises to get flat tummy)
कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
हे काही व्यायाम इन्स्टाग्रामच्या nehafunandfitness या पेजवर सुचविण्यात आले आहेत. हे सगळे व्यायाम तुम्हाला उभं राहूनच करायचे आहेत.
रेस्टॉरंटस्टाईल ओनियन सलाड! कांदा नुसताच तोंडी लावण्यापेक्षा असं काही चटपटीत करा- खाणारे होतील खुश
१. यातला पहिला व्यायाम करण्यासाठी दोन्ही पायांत साधारण एक ते दिड फूट अंतर घेऊन उभं राहा. यानंतर दोन्ही हात उचलून वर घ्या आणि टाळी वाजवा. याचवेळी उजवा पाय डाव्या पायाच्या मागे घ्या. पुन्हा उजवा पाय आधीच्या स्थितीत ठेवा आणि हात खाली घ्या. आता पुन्हा हात वर करून टाळी वाजवा आणि यावेळी डावा पाय उजव्या पायाच्या मागे घ्या. असं ५ मिनिटे तरी जलद गतीने करा.
२. दुसऱ्या व्यायामात उजवा पाय गुडघ्यात वाकवा. छातीपर्यंत गुडघा वर उचला आणि दोन्ही हातांनी मांडीच्या खाली टाळी वाजवा. असंच एकानंतर एक दोन्ही पाय उचलून करा. हा व्यायामही ५ मिनिटे करावा.
जान्हवी कपूरच्या २४ हजारांच्या लिनन साडीचा व्हायरल फोटो, तिची साडी नेसण्याची पद्धतही वेगळीच..
३. तिसऱ्या व्यायामात उजवा पाय गुडघ्यात वाकवून छातीपर्यंत उचला. दोन्ही हात डोक्याच्या मागे घ्या. आता उजवा पाय वर उचलल्यानंतर उजव्या पायाच्या गुडघ्याला डाव्या हाताचा कोपरा लावा. असाच व्यायाम डावा पाय आणि उजवा हात यांनीही करावा.