Join us  

How to lose belly fat faster : शरीर मेटेंन पण पोटच जास्त सुटलंय?  Belly Fat घटवण्यासाठी फक्त ४ पदार्थ खा, अन् नेहमी मेटेंन राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 6:27 PM

How to lose belly fat faster : बैठी जीवनशैली, हालचालींचा अभाव यांमुळे पोटावरची चरबी वाढत जाते. वेळीच लक्ष दिलं नाही तर शरीराचा आकार बेढब होत जातो. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. पण वेळेअभावी वर्कआऊट करायला वेळ मिळत नाही, अशा स्थितीत तंदुरुस्त राहायचे आणि वजन कसे कमी करायचे याची चिंता सर्वांना सतावत असते. (Hoe to lose belly fat)  तुमच्या या समस्येवर आम्ही एक उपाय आणला आहे.  (How to lose belly fat faster) तुम्हाला हे जाणून आनंद होईल की काही गोष्टी खाऊन तुम्ही तुमच्यापोटाची चरबी कमी करू शकता. (Belly fat lowering foods almonds apple cinnamon egg white quinoa weight loss obesity) बैठी जीवनशैली, हालचालींचा अभाव यांमुळे पोटावरची चरबी वाढत जाते. वेळीच लक्ष दिलं नाही तर शरीराचा आकार बेढब होत जातो. 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खा ५ पदार्थ

१) बदाम

 बदामामध्ये सर्वाधिक पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. जर तुम्ही 5 ते 6 बदाम खाल्ले तर तुमची भूक पूर्ण होते आणि तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळू शकते. बदामाच्या सेवनानं स्मरणशक्तीही चांगली राहते याशिवाय नियमित बदाम खाल्य्यानं शरीरातील प्रोटिन्सची कमरता दूर होते.

२) सफरचंद

रोज एक सफरचंद खाल्ल्याने आजारांपासून लांब राहता येतं. ते वजन कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. एका सफरचंदात 4 ते 5 ग्रॅम फायबर असते, जे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागण्यापासून दूर ठेवू शकते. सकाळी नाश्त्याला तर तुम्ही सफरचंद खाल्ले तर बराचवेळ भूक लागणार नाही पोट भरलेले वाटेल.

३) दालचिनी

तुमच्या जेवणात किंवा चहामध्ये साखरेऐवजी दालचिनी घाला.  यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राहील आणि तुमचा लठ्ठपणाही कमी होईल.

४)  क्विनोआ

भाताऐवजी क्विनोआ (Quinoa) खाऊ शकता. यामुळे स्टार्च तुमच्या शरीरात जाणार नाही आणि तुमचा लठ्ठपणा कमी होईल. याच्या सेवनाने तुम्हाला शक्तीही मिळू शकते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स