Join us  

How to Lose Belly Fat Faster : फक्त ३ महिन्यात कमी होईल पोटाचा वाढलेला घेर; ४ सोपे उपाय नेहमी दिसाल स्लिम, फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:55 AM

How to Lose Belly Fat Faster : पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे कॅलरीजचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात करा.

असे बरेच लोक आहेत ज्यांना आपल्या पोटाची चरबी कमी करायची आहे, कारण प्रत्येकाला तंदुरुस्त आणि सुंदर दिसायचे आहे. यासाठी स्लिम-ट्रिम आणि मस्क्युलर बॉडी असणं खूप गरजेचं आहे, पण चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि व्यस्त जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांची ही इच्छा पूर्ण होत नाही. (Fat Lose Tips) वजन कमी करण्याच्या काही टिप्स शेअर करत आहोत. जेणेकरून कमीत कमी वेळात तुम्ही वाढलेली चरबी घटवू शकाल. (Belly fat weight loss in just 3 months easy tips steps to follow calorie exercise walk obesity)

१) कमी कॅलरीज घ्या (Low calorie Food)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे कॅलरीजचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात करा. नाश्त्यात ओट्स, दुपारच्या जेवणात डाळ रोटी, रात्रीच्या जेवणात हलके पदार्थ खा.

निपल कव्हर वापरण्याचा नवा ट्रेण्ड, हा प्रकार नक्की काय असतो? फायदे-तोटे कोणते?

२) व्यायाम करा (Exercise)

तुम्हाला तुमचा दैनंदिन कॅलरीजचे सेवन कळले की, हीच वेळ आहे व्यायाम सुरू करण्याची किंवा काही फिटनेस एक्वटिव्हिटीजमध्ये गुंतण्याची. अशा स्थितीत स्वतःसाठी असे काही उपक्रम निवडा. ज्यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत जिमिंग किंवा कोणताही खेळ खेळू शकता.

३) दहा हजार पाऊलं चाला (Walking)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. म्हणजे दररोज सुमारे 10 हजार पावले चालणे. हा एक अतिशय सोपा व्यायाम आहे आणि तुम्हाला दररोज सुमारे 400 ते 500 कॅलरीज बर्न करण्यात मदत होईल.

सुरकुत्या, म्हातारपणाच्या खुणा झटक्यात हटवतं व्हॅम्पायर फेशियल; 'या' ट्रिटमेंटसाठी किती खर्च येतो?

४) बेली  फॅट कमी करण्याचे इतर उपाय (Belly Fat Lose Tips)

- सकाळी उठून रिकाम्या पोटी १-२ ग्लास पाणी प्या, यामुळे चयापचय वाढेल.

- जेवणाच्या अर्धा तास आधी पोटभर पाणी प्या, जास्त अन्न खाण्याची इच्छा कमी होईल.

- गोड पदार्थांचे सेवन कमी करा, कारण त्यामुळे वजन झपाट्याने वाढते.

- बसून हळूहळू खाण्याची सवय लावा, त्यामुळे अन्न पचते आणि काही वेळाने भूकही लागणार नाही.

- जास्त तेलकट पदार्थ, बर्गर, पिझ्झा, चीज इत्यादी खाणे टाळा.

- तुमचा फ्लॅट 4-5 मजल्यांवर असेल तर लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स