वजन कमी करणं सध्याच्या काळात खूप कठीण झालंय. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात. वेट लॉस गुरू डॉ. मायकल मोस्ले यांनी बेली फॅट कमी करण्यासाठी फळाबद्दल सांगितलं आहे. या फळाला आहारातून वगळून तुम्ही फ्लॅट टमी मिळवू शकता. (How to lose belly fat)
तज्ज्ञांनी दिलेल्या या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही पोटावरची वाढलेली चरबी कमी करू शकता. एक्सप्रेसशी बोलताना मोस्ले यांनी सांगितलं की जर तुम्ही बेली फॅट कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर डाएटमधून एक गोष्ट वगळावी लागेल. (Effective Tips to Lose Belly Fat)
सगळ्यात आधी इन्शुलिन कोणत्या प्रकारे काम करतं यावर अधिक लक्ष द्यायला हवं. जेवल्यानंतर शरीर ब्लड शुगर लेव्हल मेंटेन करण्यासासाठी इंसुलिन तयार करते. रक्तात ग्लूकोज लेव्हल कंट्रोल करण्याबरोबरच इन्शुलिन शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत इन्सुलिन पोहोचवण्याचे काम करते. (Weight Lose tips)
जस जसं आपलं वय वाढतं जातं सेल वॉल इंसुलिन रिसेप्टर्सप्रती कमी संवेदनशील होतात. परिणामी जेवल्यानंतर आपलं रक्त ग्लूकोज आणि फॅटी एसिड्सनं भरलेलं असतं. पोटावरची चरबी वाढण्यासाठी हे कारणीभूत ठरू शकतं. डॉ. मोस्ले यांनी सांगितलं की तुम्हाला पोटावरचं फॅट कमी करायचं असेल तर आहारातून कार्ब्स, शुगर कमी प्रमाणात घ्यायला हवी. बाजारात मिळत असलेल्या डाएट ड्रिंक्स आणि स्नॅक्समध्ये मोठ्या प्रमाणावर साखर असते. अनेकदा डाएट फूडच्या नावावर खूप फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते.
फ्रूट ज्यूस आणि स्मूदी यांबरोबर आंबा, अननस अशा फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर आढळते. लो कार्ब्स डाएटमध्ये कमी प्रमाणात फॅट्स असतात. वजन कमी करायचं असल्यास तुम्ही व्हाईट ब्रेड, चिप्स, पास्ता आणि प्रोसेस्ड फूड्स किंवा ब्राऊन राईस किंवा क्विनोआनं रिप्लेस करू शकता. पॅक्ड् फ्रुट ज्यूस घेण्यापेक्षा फळांचा ताजा घ्यायला सुरूवात करा. शक्यतो फळांच्या रसांमध्ये जास्तीची साखर घालू नका. फळांमध्ये नैसर्गिक साखर असतेच, त्यामुळे वरून साखर घालून अतिरिक्त कॅलरीज घेऊ नका.