वजन कमी करण्यासाठी काय खायचं काय खायचं नाही, सर्व खाऊन कसं वजन नियंत्रणात ठेवायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट करण्याची काही आवश्यकता नाही. रोजच्या वापरातले काही पदार्थ नियमित खाऊन तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. डाळींमध्ये सर्व प्रकारचे पोषण असते, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कुळीद डाळ खाल्ल्याने वजन कमी होण्यास कशी मदत होते. समजून घेऊया (Horse gram dal sheds kilos very fast know this kulthi dal recipe to lose weight)
कुळीद
कुळीद किंवा कुळीदाची डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याचे म्हटले जाते. प्रथिने केवळ तुमची चयापचय गतिमान करत नाहीत तर तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात. त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते. केवळ 100 ग्रॅम कुळीद डाळीतून 22 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. यामुळे कॅलरिज बर्न होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी असलेले पदार्थ खावेत. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही दूर राहतात आणि वजन कमी करण्यासाठी कमी प्रयत्न करावे लागतात.
डाळीमध्ये प्रथिने भरपूर आणि कॅलरीज कमी असतात. जे तुमच्या पचनासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी फायबरचे सेवन फार महत्वाचे आहे. 100 ग्रॅम ही डाळ खाल्ल्याने सुमारे 8 ग्रॅम फायबर मिळू शकते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे.
मेटाबॉलिझ्म वाढते
अधिक किलो वजन कमी करण्यासाठी जलद चयापचय आवश्यक आहे. कारण, चयापचय शरीरातील कार्ब्स आणि फॅट्स बर्न करते आणि त्यांचा ऊर्जेसाठी वापर करते. कुलथी डाळ खाल्ल्याने चयापचय क्रिया गतिमान होते. त्यामुळे लवकरच वजन कमी होण्यास सुरुवात होईल.
1 कप कुळीद डाळ रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी प्रेशर कुकरमध्ये 3 कप पाण्यात भिजवलेली डाळ टाका आणि त्यात मीठ आणि हळद घाला आणि 6-7 शिट्ट्या होऊ द्या. यानंतर कढईत तूप गरम करून त्यात जिरे तळून घाला. आता त्यात हिंग घाला आणि नंतर आले-लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल तिखट, मीठ आणि धणे पूड घालून परतून घ्या. २-३ मिनिटे झाकून ठेवा व नंतर त्यात कुळीद डाळ घालून ३-४ मिनिटे शिजवा. त्यानंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.