Join us  

हातपाय बारीक पण पोट सुटलंय? किचनमधले ५ पदार्थ रोज खा, बघा नॅचरल फॅट बर्नरची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:51 PM

How to lose fat fast : डाएट करूनही तुम्हाला हवातसा बदल जाणवत नसेल तर काही पदार्थांचा आहारात समावेश करून फॅट्स कमी करू शकता. 

वाढलेली चरबी कमी करण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करत असतात. डाएटपासून व्यायमापर्यंत सर्व काही करण्याची लोकांची तयारी असते. (How to Lose Body Fat) नॅच्युरल फॅट बर्नर असलेल्या काही पदार्थांचे सेवन वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करू शकते. याच्या सेवनानं कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवत नाहीत. (How to lose fat fast)

फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर आणि न्युट्रिशनिस्ट, डायटिशियन शिखा अग्रवाल यांच्यामते  या पदार्थांच्या सेवनानं फक्त वेदना कमी होत नाहीत तर आरोग्यविषयक समस्याही टाळता येतात.  या पदार्थांमुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि सेल्स चांगले राहतात.  जर डाएट करूनही तुम्हाला हवातसा बदल शरीरात जाणवत नसेल तर तुम्ही काही पदार्थांचा आहारात समावेश करून फॅट्स कमी करू शकता. 

दालचिनी

हा मसाला पेशींमध्ये ग्लुकोज जलद हलवण्यास मदत करतो, ज्यामुळे चरबी साठवण हार्मोन इन्सुलिन खूप कमी राहतो. हा मसाला रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करतो.

कंबर, पोटाची चरबी खूपच वाढलीय? घरीच करा २ व्यायाम, झरझर कमी होईल वजन

हळद

जुनाट आजारांपासून तुमचे रक्षण करण्यासोबतच हळद मानवी शरीरातील चरबीच्या पेशीही जाळते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल असे अनेक गुणधर्म असतात, जे अनेक आजारांपासून संरक्षण करतात.

टोमॅटोचा रस

ब्रिटिश जर्नल ऑफ न्युट्रिशनच्या अनुसार २० दिवसांपर्यंत टोमॅटोच्या रसाचे सेवन केल्यानं वजन वेगानं कमी होण्यास मदत होते. यामुळे एडिपोनेक्टिन नावाच्या प्रोटीन्सचे प्रमाण वाढते आणि बॉडी फॅट कमी करण्यात मिळते. 

चिंच

चिंचामुळे शरीरातं सेरोटोनिनची लेव्हल नियंत्रणार राहून भूकही नियंत्रणात राहते. भूक आणि शरीराची चरबी दोन्ही कमी होते. 

केल

दोन कप केलमध्ये 10 ग्रॅम फायबर असते जे तुमचे यकृत डिटॉक्स करण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील फॅट पेशींच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे असते. या व्यतिरिक्त, चिया सिड्स आणि एवोकॅडो देखील फॅट बर्नर म्हणून ओळखले जातात.

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स