निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम आणि सकस आहार महत्वाचा (Healthy Lifestyle). पण उलट झाल्यास, वजन वाढते. ज्यामुळे शरीर बेढप तर दिसतेच, शिवाय शरीराला गंभीर आजार विळखा घालतात. आपल्या शरीराला बऱ्याच व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पोषक तत्वांची गरज असते (Health Tips). जर या गोष्टी मिळाल्या नाहीत तर, आपले शरीर चुकीच्या पद्धतीने प्रतिसाद देऊ लागते. यापैकीच एक म्हणजे नितंबांची चरबी (Thigh and Butt Fats).
वजन वाढले की आपण शरीरावर मेहनत घेतो, आणि पौष्टीक आहार खातो (Weight Loss). पण नितंब, मांड्या, हाताची थुलथुलीत चरबी वाटते तितक्या सोप्या पद्धतीने कमी होत नाही (Fitness). बऱ्याचदा हार्मोनल बदलांमुळेही नितंबाची साईज वाढते. व्यायाम करायला जर आपल्याकडे वेळ नसेल तर, न्यूट्रिशनिस्ट दिव्या गांधी यांनी सांगितलेल्या ४ गोष्टी करा. मांड्या आणि नितंब शेपमध्ये दिसतील(How to Lose Thigh and Butt Fat without Exercise-4 Lifestyle Tips).
व्यायाम न करता हिप फॅट कमी कसे करायचे?
८ ते १० ग्लास पाणी प्या
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, हिप फॅट आणि वजन कमी करण्यासाठी नियमित ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे. अधिकाधिक पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. त्वचेवर, मेंदूच्या कार्यावर आणि एकूण शरीराच्या वजनावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. पाणी प्यायल्याने हिप फॅट कमी होण्यास मदत होते. आपण साधे पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी पिऊ शकता.
एका दिवसात जास्तीत जास्त किती साखर खावी? शरीराला किती साखरेची गरज असते?
लिंबू पाणी
दिवसाची सुरुवात आपण लिंबू पाण्याने करू शकता. यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा, आणि हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत. नियमित हे पाणी प्यायल्याने रक्ताची पीएच पातळी सुधारते आणि त्वचा तेजस्वी दिसू लागते. आपण त्यात मध घालून पिऊ शकता. यामुळे वजन घटते.
आहारात करा सकारात्मक बदल
वजन घटवण्यासाठी व्यायाम महत्वाचा. पण सोबत आपण काय आणि किती प्रमाणात खात आहात, हे देखील महत्वाचे आहे. जर आपण भरपूर प्रमाणात जंक फूड खात असाल तर, वजन कमी होण्याऐवजी वाढत जाईल. त्यामुळे हेल्दी पर्याय निवडा. सॅलड, हंगामी फळे, भाज्या, स्प्राउट्स इत्यादी पदार्थ खा. यामुळे शरीर सुडौल होईल.
उन्हाळ्यात रसाळ कलिंगड भरपूर खाल्ले तर वजन कमी होते? पण कुणाचे-कुणी न खाणंच बरं..
ग्रीन टी प्या
ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते, शिवाय वेट लॉससाठीही मदत होते. आपण दूध-साखरेच्या चहाऐवजी ग्रीन-टी पिऊ शकता.